सार

Television : टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध शो 'तारक मेहता का उल्टा' चश्मा' मधील रोशन सोढीची भूमिका साकारलेल्या जेनिफिरवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. याआधी भावाला जेनिफिरने गमावले होते. आता आयुष्यातील आणखी एका जवळच्या सदस्याला गमावले आहे.

Jennifer Mistry Sister Dies : मनोरंजन क्षेत्रातून एक अत्यंत दु:खद बातमी समोर येत आहे. रिपोर्ट्सनुसार, ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेमधील रोशन सोढीची (Roshan Sodhi) भूमिका साकारणाऱ्या जेनिफर मिस्रीच्या बहिणीचे निधन झाले आहे. डिंपल मिस्री (Dimple Mistry) 45 वर्षांच्या होत्या. दीर्घकाळापासून आजारी असल्याने डिंपल मिस्री यांचे निधन झाले आहे.

बहिणीला भेटण्यासाठी गेली होती जेनिफर मिस्री
मार्च महिन्याच्या सुरूवातीला जेनिफर मिस्री आपल्या घरी आली होती. कारण तिची बहिण डिंपलची प्रकृती अत्यंत नाजूक होती. डिंपलला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याशिवाय डिंपल व्हेंटिलेटवर होत्या. अशातच जेनिफरची बहिण डिंपल यांचे निधन झाले आहे. याआधी जेनिफर यांच्या भावाचे निधन झाले होते. आता बहिणीच्या जाण्याने जेनिफर यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला गेला आहे.

डिंपल मिस्री दीर्घकाळापासून आजारी
याआधी अशी बातमी समोर आली होती की, जेनिफर मिस्री यांची बहिण डिंपल यांना रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा बीपी कमी झाला होता. डिंपल यांच्यावर उपचारादरम्यान रुग्णालयाचे बिल लाखो रुपयांवर पोहोचले गेले. पण कुटुंबाने पैशांची व्यवस्था केली. यानंतर काही दिवसांनी कुटुंबाने डिंपल यांना एका शासकीय रुग्णालयात शिफ्ट करण्याचा निर्णय घेतला. तेथेही डिंपल यांचा बीपी (BP) फार कमी झाला. अशातच डिंपल यांना व्हेंटिलेटवर ठेण्यात आले. यानंतर डिंपल यांची प्रकृती थोडी सुधारलीही होती.

जेनिफर मिस्रीने व्यक्त केला शोक
जेनिफर मिस्रीला बहिणीच्या निधनाने धक्का बसला आहे. बहिणीचे आणि माझे नाते अत्यंत जवळचे होते. यामुळे तिचे निधन झालेय यावर विश्वास बसत नसल्याचेही जेनिफर मिस्रीने म्हटले आहे. डिंपलसोबतच्या काही आठवणीही जेनिफरने सांगितल्या. वर्ष 2022 मध्ये जेनिफरने आपल्या भावाला गमावले होते. आता बहिणीच्या निधनाने संपूर्ण मिस्री परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळा गेलाय.

भावाच्या मृत्यूनंतर सात मुलींची जबाबदारी
गेल्या दीड वर्षांपासून जेनिफर मिस्री बंसीवाल कठीण काळाचा सामना करत आहे. जेनिफरने म्हटले होते की, लहान भावाच्या निधनानंतर माहेरच्या सात मुलींची जबाबदारी माझ्यावर आली आहे. याचवेळी असित मोदींसोबतचे वादाचे प्रकरणही सुरू आहे. या सर्व गोष्टी एकाचवेळी पाहणे मुश्किल झाले आहे. याच गोष्टींमुळे काही वर्षांपासून कठीण समस्यांचा सामना करत असल्याचेही जेनिफरने म्हटले होते.

असित मोदींसोबतचा वाद
जेनिफरच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास तिला अद्याप कोणतेही नवे काम मिळालेले नाही. दुसऱ्या बाजूला जेनिफरने तारक मेहता का उल्टा चश्माचे निर्माते असित मोदी (Asit Modi) यांच्या विरोधातील लैंगिक शोषणाचा खटला जिंकला आहे. कोर्टाने असित मोदी यांना जेनिफरला पाच लाख रुपये नुकसान भरपाई देण्यासह शिल्लक थकबाकी देण्यास सांगितली आहे. पण अद्याप असित मोदी यांनी जेनिफरला नुकसान भरपाईची रक्कम दिलेली नाही.

आणखी वाचा : 

अभिनेत्री शिल्पा शेट्टी व राज कुंद्राची 97.79 कोटी रुपयांची संपत्ती ईडीने केली जप्त; आता पर्यंत कोणत्या कारवाया जाणून घ्या

जगातील प्रभावशाली व्यक्तींच्या लिस्टमध्ये भारतातील एकमेव अभिनेत्रीचा समावेश, कोण आहे ती?