जगातील प्रभावशाली व्यक्तींच्या लिस्टमध्ये भारतातील एकमेव अभिनेत्रीचा समावेश, कोण आहे ती?

| Published : Apr 18 2024, 11:02 AM IST / Updated: Apr 18 2024, 11:22 AM IST

Alia Bhatt

सार

Entertainment : टाइम्सची जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींची लिस्ट नुकतीच जारी करण्यात आली. या लिस्टमध्ये भारतातील एकाच अभिनेत्रीला स्थान मिळाले आहे. याशिवाय देशातील अन्य क्षेत्रातील व्यक्तींची नावेही लिस्टमध्ये आहेत.

Times 100 Most Influential People 2024 List : टाइम्स मॅगझीनने जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींची लिस्ट बुधवारी (18 एप्रिल) जारी केली. या लिस्टमध्ये जगभरातील प्रतिष्ठित व्यक्तींची नावे आहेत. खास गोष्ट अशी की, या लिस्टमध्ये भारतातील अन्य क्षेत्रातील काही जणांचीही नावे आहेत. अशातच बॉलिवूडमधील अभिनेत्री आलिया भट्टला (Alia Bhatt) टाइम्सच्या प्रभावशाली व्यक्तींच्या लिस्टमध्ये स्थान मिळाले आहे. याशिवाय 'मंकी मॅन' सिनेमाचे अभिनेते देव पटेल यांच्यासह प्रसिद्ध पहलवान साक्षी मलिकचेही (Sakshi Malik) नाव आहे.

आलिया भट्टचे कौतुक
टाइम्स मॅगझीनने जारी केलेल्या प्रभावशाली व्यक्तींच्या लिस्टमध्ये आलिया भट्टला स्थान दिले आहे. मॅगझीनच्या एका फीचरसाठी आलियासोबत हॉलिवूडमधील सिनेमा 'हार्ट ऑफ स्टोन' चे (Heart of Stone) दिग्दर्शक टॉम हार्पर यांनी आलियाचे कौतुक केले आहे. या सिनेमातून आलियाने हॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता.

हार्ट ऑफ स्टोन सिनेमात आलियासोबत गॅल गॅडोट, जेमी डोर्नन, जिंग लुसी मुख्य भूमिकेत होते. याशिवाय टाइम्सच्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला, व्यावसायिक अजय बंगा, प्रसिद्ध शेफ आसमां खान, अभिनेता जेफरी राइट, ऑस्कर विजेता डावाइन जॉय रँडोल्फ (Da'Vine Joy Randolph), येल विद्यापीठाचे प्राध्यापक प्रियमवदा नटराजन यांच्यासह अन्य काहींची नावे आहेत.

View post on Instagram
 

आलियाच्या कामाबद्दल थोडक्यात…
आलियाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास तिने वर्ष 2003 मध्ये आलेल्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' मध्ये रणवीर सिंह सोबत स्क्रिन शेअर केली होती. सिनेमाचे दिग्दर्शन करण जौहरने केले होते. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर सर्वसाधारण कमाई केली होती. आलिया, रणवीरसह सिनेमात जया बच्चन, धर्मेंद्र, शबाना आजमीही मुख्य भूमिकेत दिसून आले.

आलियाचा आगामी सिनेमा 'लव्ह अ‍ॅण्ड वॉर' संजय लीला भंन्साळी यांनी दिग्दर्शित केला आहे. यामध्ये आलियासोबत रणबीर कपूर आणि विक्की कौशल मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या सिनेमाचे लवकरच शूटिंग सुरू होणार असल्याची चर्चा आहे.

आणखी वाचा : 

लाल बनारसी लेहेंग्यातला क्रिती सेनॉनचा रॉयल लुक पहिला का ?

'जेठालाल' ते 'अनुपमा' मालिकेतील कलाकार वसूल करतात ऐवढी Fees