सार
अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याच्यावर सक्तवसुली संचालनालयानं ED ने मोठी कारवाई केली आहे. ईडीनं कुंद्रा याची ९७ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.यामध्ये शिल्पाच्या नावावर असलेला जुहूमधील एक फ्लॅटही जप्त करण्यात आला आहे.
Shilpa Shetty Raj Kundra properties seized by ED: अभिनेत्री शिल्पा शेट्टी व तिचा उद्योजक पती राज कुंद्रा यांच्याबद्दल मोठी माहिती समोर आली आहे. ईडीने शिल्पा शेट्टी व राज कुंद्राच्या मालकीची 97.79 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. यामध्ये शिल्पाच्या नावावर असलेल्या जुहूतील फ्लॅटचाही समावेश आहे.
ईडीने शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याच्या मालकीची स्थावर आणि जंगम मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे. ही कारवाई पीएमएलए 2002 अंतर्गत तरतुदींनुसार करण्यात आली आहे. जप्त केलेल्या मालमत्तेत जुहूमधील फ्लॅटचा समावेश आहे. याचबरोबर शिल्पा व राज यांचा पुण्यातील बंगला व राजच्या नावावर असलेले इक्विटी शेअर्सही जप्त करण्यात आले आहेत. तसेच 2021 साली उघडकीस आलेल्या पॉर्नोग्राफी प्रकरणात कुंद्रा यांचे नाव समोर आले होते. या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. मात्र, नंतर त्यांना जामीन मिळाला.
शिल्पा व राजवर या प्रकरणात झाली कारवाई :
बिटकॉइन पॉन्झी घोटाळ्याप्रकरणी ईडीने कुंद्रा यांच्यावर कारवाई केली आहे. जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांमध्ये पुण्यातील बंगला आणि इक्विटी शेअर्सचाही समावेश आहे. ईडीने महाराष्ट्र पोलिस आणि दिल्ली पोलीसांतर्फे वन व्हेरिएबल टेक प्रायव्हेट लिमिटेड आणि आरोपी दिवंगत अमित भारद्वाज, अजय भारद्वाज, विवेक भारद्वाज, सिम्पी भारद्वाज, महेंद्र भारद्वाज आणि इतरांविरुद्ध एफआयआर नोंदवल्यानंतर ईडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला होता.
आता पर्यंत कोणत्या कारवाई झाल्या :
- 2013 च्या आयपीएलदरम्यान सट्टेबाजी प्रकरणात दिल्ली पोलिसांनी राज कुद्रांची चौकशी केली होती.
- 2017 मध्येही घोटाळ्यासंदर्भात राज कुंद्रांचे नाव चर्चेत आले होते. कारण ऑनलाइन शॉपिंगच्या माध्यमातून एका व्यापाऱ्याला लाखो रुपयांना गंडा घातल्या प्रकरणात त्यांचे आणि शिल्पा शेट्टीचे नाव चर्चेत आले होते. शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा आणि त्यांच्या तीन साथीदारांविरोधात या प्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला होता.
- बिटकॉईन घोटाळ्यात राज कुंद्रांना ईडी अर्थात अंमलबजावणी संचलनालयाने 2018 साली समन्स बजावले होते. 2 हजार कोटींचा हा बिटकॉईन घोटाळा असण्याचं सांगण्यात आलेलं. समन्स जारी केल्यानंतर 5 जून 2018 रोजी राज कुंद्रांनी इडीचे कार्यालय गाठले होते. या कार्यालयात इडीच्या अधिकाऱ्यांकडून राज कुंद्रांची कसून चौकशी करण्यात आली.
- 2019 मध्ये ऑक्टोबर महिन्यात इक्बाल मिर्ची कनेक्शन प्रकरणात राज कुंद्रा यांना ईडीने समन्स बजावलं होतं. राज कुंद्रा यांचे अंडरवर्ल्डसोबत संबंध असल्याचा संशय ईडीने व्यक्त केला होता. इक्बाल मिर्ची या कुख्यात गुंडासोबत राज कुंद्रा यांनी व्यावसायिक करार केल्याचा संशय ईडीने व्यक्त केलेला. त्यामुळेच राज कुंद्रांना चौकशीला बोलवण्यात आलं होतं.
- तसेच 2021 साली अश्लील चित्रपटांची निर्मिती करून अॅप्सवर प्रदर्शित करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. याच प्रकरणात राज कु्ंद्रा यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली.
- द सिक्युरिटीज अॅन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियानेही (सेबी)यांनी देखील कारवाईचा बडगा उगारला होता. यामध्ये शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा व त्यांची कंपनी विआन इंडस्ट्रीकडून व्यापाराच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याचा ठपका सेबीनं ठेवला होता. सेबीनं मागवलेल्या खुलाशात त्यांनी ही चुक मान्य केली होती. पण त्यानंतर सेबीकडून त्यांच्यावर कारवाई करत तीन लाखांचा दंड ठोठावला होता.
आणखी वाचा :
जगातील प्रभावशाली व्यक्तींच्या लिस्टमध्ये भारतातील एकमेव अभिनेत्रीचा समावेश, कोण आहे ती?