कोट्यावधींचे मालक आहेत TMKOC चे जेठालाल, एक दिवासाची कमाई ऐकून व्हाल हैराण

| Published : May 27 2024, 07:58 AM IST

TMKOC Jethalal Income

सार

तारक मेहता का उल्टा चश्मामधील प्रसिद्ध कलाकारात दिलीप जोशी नेहमीच चर्चेत राहतात. पण तुम्हाला जेठालाल यांचे नेटवर्थ माहितेय का? याबद्दल जाणून घेऊया...

Entertainment : टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध ‘शो तारक मेहता का उल्टा चश्मा’ गेल्या काही वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर आपला ठसा उमटवत आहेत. या टेलिव्हिजन मालिकेतील प्रत्येक पात्र घराघरात पोहोचले गेलेय. अशातच शो मध्ये जेठालाल यांची भूमिका साकारणारे दिलीप जोशी यांना कोण ओखळत नाही.

खरंतर, दिलीप दोशी तीन दशककांपासून मनोरंजन क्षेत्रात काम करत आहेत. पण तारक मेहता का उल्टा चश्मामध्ये जेठालाल यांची भूमिका साकारत त्या पात्राने प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच छाप सोडली आहे. दिलीप जोशी शो मधील सर्वाधिक फी घेणारे कलाकार आहेत. अभिनेते प्रत्येक दिवशी लाखो रुपयांची कमाई करतात. अशातच दिलीप जोशी यांचे नेटवर्थ जाणून घेऊया...

दिलीप जोशी यांच्या करियरची सुरुवात
दिलीप जोशी यांनी वयाच्या 12 व्या वर्षी अभिनयाच्या जगात पाऊल ठेवले. त्यांनी काही सिनेमात कामही केले आहे. दिलीप जोशी यांनी सलमान खान याचा सिनेमा 'मैंने प्यार किया' च्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. पण खरी ओखळ तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेमुळे मिळाली. आज दिलीप जोशी कोट्यावधींची कमाई करतात.

कोट्यावधींच्या संपत्तीचे मालक
रिपोर्ट्सनुसार, दिलीप जोशी यांचे नेटवर्थ 47 कोटी रुपये आहे. वर्ष 2023 मध्ये आलेल्या 'कोईमोई' यांच्या रिपोर्ट्सनुसार, गेल्या पाच वर्षांमध्ये दिलीप जोशी यांचे नेट वर्थ 135 टक्क्यांनी वाढले गेलेय. अभिनेत्याने नेटवर्थ पाच वर्षांमध्ये 20 कोटी रुपयांनी वाढून 47 कोटी रुपये झाले आहे. अभिनेते एका एपिसोडसाठी 1.5 लाख रुपयांची फी घेतातत. अशाप्रकारे आठवड्याभरात दिलीप जोशी 7.5 लाख रुपयांची कमाई करतात. दिलीप जोशी टेलिव्हजन मालिकेव्यतिरिक्त जाहिरात, ब्रँड प्रमोशन आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून उत्तम कमाई कतात. याशिवाय सोशल मीडियावर सातत्याने अ‍ॅक्टिव्ह असतात. इंस्टाग्रामवरील रिल्सच्या माध्यमातूनही दिलीप जोशी यांची उत्तम कमाई होते.

आणखी वाचा : 

Top TV Actress झालीय कास्टिंग काउचची शिकार, अशी मागणी ऐकून व्हाल हैराण

बॉलिवूड नव्हे साउथ सिनेमात हे कलाकार आजमावणार आपले नशीब, पाहा लिस्ट