'आजकाल मुलं परवानगी घेत नाही, केवळ...', सोनाक्षी-जहीर इक्बालच्या लग्नाबद्दल शत्रुघ्न सिन्हांनी केले धक्कादायक विधान

| Published : Jun 11 2024, 09:35 AM IST

Sonkashi Sinha Wedding
'आजकाल मुलं परवानगी घेत नाही, केवळ...', सोनाक्षी-जहीर इक्बालच्या लग्नाबद्दल शत्रुघ्न सिन्हांनी केले धक्कादायक विधान
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल यांच्या लग्नाच्या चर्चांनी सध्या जोर धरला आहे. दोघे येत्या 23 जूनला लग्न करणार असल्याचे बोलले जात आहे. अशातच मुलीच्या लग्नासंदर्भात वडील शत्रुघ्न सिन्हांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Sonakhi Sinha Wedding : ‘हिरामंडी’ मधून झळकलेली अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाच्या चर्चांनी जोर धरला आहे. येत्या 23 जूनला सोनाक्षीचे अभिनेता जहीर इक्बालसोबत विवाह होणार असल्याचे अनेक रिपोर्ट्समधून सांगण्यात आले आहेत. या दोघांच्या लग्नासाठी सोनाक्षीचे वडील शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) यांनीही परवानगी दिली आहे. दरम्यान, कपलने अद्याप लग्नाच्या चर्चांवर मौन धरले आहे. अशातच शत्रुघ्न सिन्हा यांनी लग्नाच्या चर्चांवर प्रतिक्रिया देत म्हटले की, लेकीने अद्याप मला काहीही सांगितलेले नाही.

काय म्हणाले शत्रुघ्न सिन्हा
शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटले की, आजकालची मुलं लग्नासाठी परवानगी मागत नाहीत. त्याएवजी आपला निर्णय पालकांना थेट सांगून मोकळे होतात. मी सध्या दिल्लीत आहे. यामुळे लेकीच्या लग्नाबद्दल कोणाशीही बोललेलो नाही. खरंतर, सोनाक्षी लग्न करणार असा तुमचा प्रश्न आहे तर याबद्दल तिने मला काहीही सांगितलेले नाही.

पुढे सिन्हा यांनी म्हटले की, मला आतापर्यंत जेवढे माहितेय तेच सांगितले. जर सोनाक्षीने मला-आईला विश्वासात घेऊन सांगितल्यास आम्ही दोघे त्यांना आशीर्वाद देऊ. त्यांच्या आनंदासाठी प्रार्थना करू. खरंतर, सोनाक्षी तिचे योग्य निर्णय घेईल असेही शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटले.

सोनाक्षीला स्वत:चा निर्णय घेण्याचा अधिकार
सोनाक्षीला तिचा स्वत:चा निर्णय घेण्याचा पूर्णपणे अधिकार असल्याचे शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटले आहे. मुलीचे लग्न झाल्यास मला आनंद होईलच. पण तिच्या लग्नाच्या वरातीत मला मनसोक्त नाचायचे आहे.

कुठे होणार लग्न
इंडिया टुडेनुसार, खास मित्रमंडळींव्यतिरिक्त लग्नसोहळ्यात हिरामंडीमधील कास्टला आमंत्रण पाठवण्यात आले आहे. असे म्हटले जातेय की, लग्नाची पत्रिका एखाद्या मॅगझिन कव्हरसारखी डिझाइन करण्यात आली आहे. यामध्ये लिहिले आहे की, अफवा खऱ्या आहेत. पाहुण्यांना फॉर्मल आउटफिट परिधान करुन येण्यास सांगितले आहे. लग्नासोहळा मुंबईतील बॅस्टियनमध्ये साजरा होईल. दरम्यान, अद्याप अभिनेत्रीकडून लग्नाचे कोणतेही अपडेट समोर आलेले नाही.

कोण आहे जहीर इक्बाल
जहीर इक्बाल दीर्घकाळापासून रुपेरी पडद्यापासून दूर आहे. याचा अखेरचा सिनेमा 'डबल एक्सएल' होता. अभिनेता लवकरच कॅमिओ रोलमध्ये 'रुस्लान' मध्ये झळकणार आहे.

आणखी वाचा : 

सोनाक्षी सिन्हा प्रियकर जहीर इकबालसोबत करणार लग्न? वेडिंग डेट आणि वेन्यूची माहिती आली समोर

'चौदहवीं का चाँद', सोनाक्षी सिन्हासारखे 8 एथनिक Outfits, दिसाल मनमोहक