सार

Sonakshi Sinha Marriage : अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा सुरु झाली आहे. रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्री जून महिन्यातच प्रियकर आणि अभिनेता जहीर इक्बालसोबत लग्नगाठ बांधणार आहे.

Sonakshi Sinha and Zaheer Iqbal's Wedding : बॉलिवूडमधील अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. खरंतर, सोनाक्षीने तिच्या लग्नाबद्दल द ग्रेट इंडियन कपिल शो मध्ये भाष्य केले होते. अशातच सोनाक्षीच्या लग्नासंदर्भाती अपडेट्स समोर येत आहेत. गेल्या काळापासून सोनाक्षी सिन्हा अभिनेता जहीर इक्बाल याला डेट करत आहे. या दोघांना अनेकदा एकमेकांसोबत स्पॉट करण्यात आले आहे. आता अशा चर्चा सुरु झाल्यात की, येत्या 23 जूनला सोनाक्षी सिन्हा मुंबईत लग्न करणार आहे.

अभिनेत्रीची इक्बालसोबतची पोस्ट
सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता जहीर दोघेही सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत असतात. नुकताच काही दिवसांपूर्वी सोनाक्षी सिन्हाचा वाढदिवस झाला. यावेळी जहीरने सोनाक्षीला वाढदिवाच्या शुभेच्छा देत काही रोमँटिक फोटो शेअर केले होते.

View post on Instagram
 

कुठे होणार लग्न
इंडिया टुडेनुसार, खास मित्रमंडळींव्यतिरिक्त लग्नसोहळ्यात हिरामंडीमधील कास्टला आमंत्रण पाठवण्यात आले आहे. असे म्हटले जातेय की, लग्नाची पत्रिका एखाद्या मॅगझिन कव्हरसारखी डिझाइन करण्यात आली आहे. यामध्ये लिहिले आहे की, अफवा खऱ्या आहेत. पाहुण्यांना फॉर्मल आउटफिट परिधान करुन येण्यास सांगितले आहे. लग्नासोहळा मुंबईतील बॅस्टियनमध्ये साजरा होईल. दरम्यान, अद्याप अभिनेत्रीकडून लग्नाचे कोणतेही अपडेट समोर आलेले नाही.

कोण आहे जहीर इक्बाल
जहीर इक्बाल दीर्घकाळापासून रुपेरी पडद्यापासून दूर आहे. याचा अखेरचा सिनेमा 'डबल एक्सएल' होता. अभिनेता लवकरच कॅमिओ रोलमध्ये 'रुस्लान' मध्ये झळकणार आहे.

आणखी वाचा : 

Munjya Box Office Collection Day 3 : 'मुंज्या' सिनेमाची प्रेक्षकांवर छाप, 30 कोटींच्या कलेक्शनसाठी एवढे रुपये कमी

विक्रम भट्टच नव्हे या व्यक्तीसोबत होते Ameesha Patel चे रिलेशनशिप