Shaitan Trailer : माधवनचा काळ्या जादूपासून मुलीला वाचवू शकणार का अजय देवगण? पाहा 'शैतान' सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर

| Published : Feb 22 2024, 05:37 PM IST / Updated: Feb 22 2024, 05:47 PM IST

Shaitan Movie Trailer

सार

‘शैतान’ सिनेमाची पहिली झलक पाहिल्यानंतर प्रेक्षकांकडून ट्रेलरची वाट पाहिली जात होती. आज सिनेमाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. ट्रेलर पाहून नक्कीच तुमच्या अंगावर काटा येणार आहे.

Shaitan Trailer Launched : अजय देवगण आणि ज्योतिका स्टारर ‘शैतान’ सिनेमाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. याआधी सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्यात आल्याने प्रेक्षकांची सिनेमाबद्दलची उत्सुकता अधिक वाढली गेली. ट्रेलर पाहिल्यानंतर सिनेमा नक्कीच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार असल्याची आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

‘शैतान’ सिनेमाचा ट्रेलर लाँच
सिनेमाच्या ट्रेलरच्या सुरुवातीला एक व्यक्ती घरात बसलेला दिसतो. एक मुलगी आपल्या वडिलांशी घारबलेल्या आवाजात बोलते की, आपल्याकडे कोणीतरी आले आहे आणि तो जात नाहीय. या व्यक्तीवर संशय व्यक्त केला जातो. काही वेळाने त्या व्यक्तीचा चेहरा समोर येतो. हा व्यक्ती म्हणजेच आर. माधवन, तो अजय देवगणला बोलतो त्याला 15 मिनिटे घरात थांबायचे आहे कारण त्याचा फोनची बॅटरी डेड झालीय. अशा प्रकारे हळूहळू ट्रेलरमधून सिनेमाच्या कथेची झलक पाहायला मिळत आहे.

YouTube video player

गुजराती सिनेमा 'वश' चा रिमेक आहे ‘शैतान’
'शैतान' सिनेमा गेल्या वर्षात फेब्रुवारी महिन्यात प्रदर्शित झालेला गुजराती सिनेमा 'वश' चा रिमेक आहे. या सिनेमात साउथची प्रसिद्ध अभिनेत्री ज्योतिका बॉलिवूडमध्ये 27 वर्षानंतर कमबॅक करणार आहे. 

आणखी वाचा : 

Bhool Bhulaiyaa 3 सिनेमात कार्तिक आर्यनसोबत मुख्य भुमिकेत झळकणार तृप्ति डिमरी, अभिनेत्याने शेअर केली इंस्टाग्राम पोस्ट

Dadasaheb Phalke Awards 2024 : शाहरुख खानला मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी

विराट-अनुष्काच्या मुलाला UK चे नागरिकत्व मिळणार? वाचा काय आहे नियम