विराट-अनुष्काच्या मुलाला UK चे नागरिकत्व मिळणार? वाचा काय आहे नियम
विराट-अनुष्का पुन्हा एकदा आई-बाबा झाले आहेत. लंडनमध्ये अनुष्काने गोंडस बाळाला जन्म दिला असून त्याचे नाव ‘अकाय’ ठेवले आहे. पण अकायला लंडनचे नागरिकत्व मिळणार का?
जेथे तुमचा जन्म झालेला असतो तेथील तुम्ही नागरिक असता. यासाठी तुमच्या आई-वडिलांपैकी एक त्या देशाचा नागरिक असला पाहिजे. प्रत्येक देशाचे नागरिकत्व मिळण्यासंदर्भात नियम वेगळे आहेत.
विराट-अनुष्का भारतीय नागरिक असून केवळ वैद्यकिय सुविधा लंडनमध्ये उत्तम असल्याने त्यांच्या बाळाचा जन्म तेथे झाला आहे. यामुळे जन्मानंतरही अकायला लंडनचे नागरिकत्व मिळणार नाही.
सर्वप्रथम लंडनमध्ये पाच वर्ष वैध व्हिजावर राहिल्यानंतर तेथील नागरिकत्वासाठी अर्ज करता येत होता. यानंतर इंग्रजी आणि काही परीक्षा द्याव्या लागत होत्या. पण आता नियम बदलला आहे.
लंडनमध्ये व्हॅलिड व्हिजासोबत पाच वर्ष राहिल्यानंतरही कोणाला कायमचे नागरिकत्व दिले जात नाही. फक्त अस्थायी नागरिकत्व मिळते.
लंडनमधील नागरिकत्व मिळवण्यासाठी अर्ज करणाऱ्यांना वेगवेगळ्या मुद्द्यांवर काही पॉइंट्स दिले जातात. नियमानुसार, ठरवलेल्या पॉइंट्सच्या आधारावर युकेमध्ये कायमचे नागरिकत्व मिळते.
नियमानुसार, एखाद्या व्यक्तीने ब्रिटिश नागरिकाशी लग्न केल्यास त्याला तेथील नागरिकत्व मिळणे सोपे होते. पण यासाठीचे नियम वेगळे आहेत.