Dadasaheb Phalke Awards 2024 : शाहरुख खानला मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी

| Published : Feb 21 2024, 12:22 PM IST / Updated: Feb 21 2024, 12:24 PM IST

dadasaheb phalke international film festival awards

सार

दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार सोहळा नुकताच मुंबईत पार पडला. या सोहळ्याला सिनेसृष्टीतील बड्या कलाकारांनी उपस्थिती लावल्याचे दिसून आले.

Dadasaheb Phalke Awards 2024 : दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव नुकताच मुंबईतील ताज लॅण्ड्स अ‍ॅण्ड हॉटेलमध्ये पार पडला. या सोहळ्यासाठी वेगवेगळ्या श्रेणीतील पुरस्कार दिले गेले. यामध्ये अभिनेता शाहरुख खानला (Shah Rukh Khan) ‘जवान’ सिनेमासाठी (Jawan) सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. याशिवाय सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार नयनताराला (Nayanthara) (जवान) सिनेमासाठी दिला गेला. या सोहळ्याला करीना कपूर, रणबीर कपूर, शाहिद कपूर, अनिल कपूरसह अन्य बड्या कलाकारांनी उपस्थिती लावली होती.

दादा साहेब फाळके पुरस्कार 2024 च्या विजेत्यांची यादी

 • सर्वोत्कृष्ट अभिनेता - शाहरुख खान (जवान)
 • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - नयनतारा (जवान)
 • सर्वोत्कृष्ट अभिनेता (नकारात्मक भुमिका) - बॉबी देओल (अ‍ॅनिमल)
 • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - संदीप रेड्डी वांगा (अ‍ॅनिमल)
 • सर्वोत्कृष्ट अभिनेता (क्रिटिक) - विकी कौशल (सॅम बहादुर)
 • सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक - अनिरुद्ध रविचंगर (जवान)
 • सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक (पुरुष) - वरुण जैन, तेरे वास्ते (जरा हटके जरा बचके)
 • सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका (महिला) - शिल्पा राव, बेशरम रंग (पठान)
 • टेलिव्हिजन मालिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - रूपाली गांगुली (अनुपमा)
 • टेलिव्हिजन मालिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेता - नील भट्ट ( गुम है किसी के प्यार में)
 • टेलिव्हिजन सीरिज ऑफ द इअर - गुम है किसी के प्यार है
 • बेव सीरिजमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - करिश्मा तन्ना (स्कूप)
 • चित्रपट उद्योगात उत्कृष्ट योगदान - मौसमी चॅटर्जी
 • संगीत उद्योगातील उत्कृष्ट योगदान - केजे येसुदास

पुरस्कार सोहळ्यासाठी बॉलिवूड कलाकारांची रेड कार्पेटवर धमाकेदार एण्ट्री
दादासाहेब आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार सोहळ्याला बॉलिवूड कलाकारांनी रेड कार्पेटवर धमाकेदार एण्ट्री केल्याचे दिसून आले. करीना कपूरने गोल्डन रंगातील आउटफिटमध्ये सुंदर दिसत होती. याशिवाय शाहिद कपूरने काळ्या रंगातील सूट परिधान केल्याने क्युट दिसत होता. राणी मुखर्जीसह नयनतारा, आदित्य रॉय कपूर, जावेद जाफरी, विक्रांत मेसी, सोनल चौहान, अदा शर्मा, सान्या मल्होत्रा यांच्यासह अन्य कलाकारांनीही सोहळ्याला उपस्थिती लावली होती.

आणखी वाचा : 

विद्या बालनच्या नावाखाली सोशल मीडियात नागरिकांची फसवणूक, अभिनेत्रीने दाखल केला FIR

Exclusive : देशातील तरुणांसाठी सात वर्षानंतर रेसलिंगच्या जगात संग्राम सिंहचे कमबॅक, वाचा अभिनेत्याने दिलेला फिटनेस मंत्र

तमिळ सिनेसृष्टीतील या कलाकारांची ऐवढी आहे संपत्ती, ऐकून व्हाल हैराण