शोएब मलिकसाठी सानिया मिर्झाने SRKकडे मागितली होती ही मदत
Entertainment Jan 23 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:Instagram
Marathi
शाहरुखच्या शो चा व्हिडीओ व्हायरल
सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांच्यामध्ये घटस्फोट होणार असल्याच्या बातम्या सुरू असतानाच शाहरुख खानच्या शो चा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
Image credits: Getty
Marathi
शाहरुखच्या शो साठी सानिया-शोएबची उपस्थिती
व्हिडीओमध्ये शाहरुख खान कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत असून पाहुणे म्हणून आलेल्या सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांना लग्न करण्यामागील कारण विचारत आहे.
Image credits: bollyeedit
Marathi
सानियाने शाहरुखकडे मागितली होती मदत
सानियाने कार्यक्रमावेळी म्हटले होते की, शोएब मलिक अत्यंत लाजाळू व्यक्ती आहे. तो बोलतानाही लाजतो. त्याला कसे बोलायचे हे शिकवले पाहिजे.
Image credits: social media
Marathi
शोएबची प्रतिक्रिया
शोएबने लग्नाबद्दलच्या शाहरुखच्या प्रश्नाला उत्तर देत म्हटले होते की, काही विचार करण्याआधीच लग्न झाले.
Image credits: Social Media
Marathi
शोएबचा पाकिस्तानी अभिनेत्रीसोबत विवाह
टेनिसपटू सानिया मिर्झासोबतच्या घटस्फोटाच्या अफवादरम्यान शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद सोबत विवाह केला आहे. या दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Image credits: instagram
Marathi
सानियाचा संसार मोडणार?
शोएब मलिक आणि सानिया मिर्झा यांच्या घटस्फोटाच्या बातम्या समोर आल्यानंतर शोएबच्या अफेअरमुळे सानियाने घटस्फोट घेणार असल्याचा निर्णय घेतल्याचे तर्कवितर्क लावले जात आहेत.
Image credits: Social Media
Marathi
सानियाच्या चाहत्यांकडून शोएबर टीका
सानियाच्या चाहत्यांकडून तिला पूर्णपणे पाठिंबा दिला जात आहे. दुसऱ्या बाजूला सानियाच्या चाहत्यांकडून शोएब मलिकवर जोरदार टीका करण्यात येत आहे.