सार

पॉप स्टार दुआ लिपा हिला सोशल मीडियात युजर्सकडून ट्रोल केले जात आहे. यामागील कारण म्हणजे तिने नुकतेच सोशल मीडियावर शेअर केलेले तिचे फोटो.

Dua Lipa Instagram Post : पॉप स्टार दुआ लिपा हिने नुकताच भारतात दौरा केला होता. राजस्थानमध्ये (Rajasthan) दुआ लिपा आली होती. दुआ लिपाने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. याच कारणास्तव युजर्सकडून दुआला ट्रोल केले जात आहेत.

दुआ लिपाने राजस्थानमधील काही फोटो शेअर केले होते. यामध्ये किल्ल्यांसह हॉटेलचे फोटो पोस्ट केले आहेत. इंटरनेटवर युजर्सकडून हा आरोप लावण्यात येत आहे की, राजस्थान दौऱ्यादरम्यान दुआ लिपाने पॉवर्टी पॉर्नचे फोटो शेअर केले आहेत.

लुआ लिपाच्या फोटोंमुळे वाद
दुआने शेअर केलेल्या फोटोमध्ये काही राजस्थानी महिला एका मंदिरासमोरील रस्त्यावर उभ्या आहेत. गरीब घरातील या महिला दुआच्या कॅमेऱ्याकडे पाहून हसत आहेत. हेच फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम (Instagram) ते एक्स (X) वर शेअर करत युजर्स दुआ लिपाच्या विरोधात कमेंट्स करत आहेत.

View post on Instagram
 

कोण आहे दुआ लिपा
दुआ लिपा ही हॉलिवूडमधील पॉप स्टार आणि अभिनेत्री आहे. ती मूळरूपात अल्बानिया (Albania) येथे राहणारी आहे. दुआने गायकाच्या रूपात आपल्या करियरची सुरुवात केली होती.

दुआने आपल्या करियरच्या सुरुवात केली आणि वर्ष 2014 मध्ये ती जगप्रसिद्ध झाली. आतापर्यंत दुआने काही हिट गाणी दिली आहेत. दुआ भारतात आल्याने भारतीय चाहत्यांनी आनंद व्यक्त केला होता. पण आता शेअर केलेल्या फोटोंमुळे दुआ लिपाला सोशल मीडियामध्ये चांगलेच ट्रोल केले जात आहे.

आणखी वाचा: 

हृतिक रोशनने या गोष्टीला नकार दिल्यामुळे प्रभास झाला सुपरस्टार

Oscars 2024: 96 व्या ऑस्कर पुरस्कारासाठी या सिनेमांना मिळालेय नामांकन, पाहा यादी

या अभिनेत्याच्या पत्नीने 24 वर्षानंतर अचानक मागितला होता घटस्फोट