हृतिक रोशनने या गोष्टीला नकार दिल्यामुळे प्रभास झाला सुपरस्टार
Entertainment Dec 23 2023
Author: Chanda Mandavkar Image Credits:Facebook
Marathi
हॉटेल सुरू करायचे होते
दाक्षिणात्य सिनेमातील सुपरस्टार प्रभास आज आपल्या यशाच्या शिखरावर आहे. पण तुम्हाला माहितेय का, अभिनय करण्याआधी प्रभासला स्वत:चे एक हॉटेल सुरू करायचे होते.
Image credits: facebook
Marathi
ईश्वर सिनेमातून पदार्पण
प्रभासने वर्ष 2002 मध्ये ‘ईश्वर’ सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. या सिनेमातील प्रभासच्या अभिनयाला प्रेक्षकांनी खूप पसंत केले होते.
Image credits: facebook
Marathi
हृतिकने दिला नकार
प्रभासच्या आधी हृतिक रोशन याला 'बाहुबली' सिनेमाची ऑफर देण्यात आली होती. पण काही कारणास्तव हृतिकने सिनेमा करण्यास नकार दिला. यामुळेच प्रभासला बाहुबली सिनेमासाठी विचारण्यात आले.
Image credits: Facebook
Marathi
बाहुबली सिनेमामुळे मिळाली प्रसिद्धी
'बाहुबली' सिनेमाच्या दोन्ही भागांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत सर्व रेकॉर्ड ब्रेक केले होते. सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर प्रभासची प्रसिद्धी अधिकच वाढत गेली.
Image credits: Facebook
Marathi
फ्लॉप सिनेमे
'बाहुबली' सिनेमाच्या यशानंतर प्रभासचे काही सिनेमे फ्लॉप ठरले. यामध्ये 'साहो', 'राधेश्याम' सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपटला तरीही प्रेक्षकांनी प्रभाससाठी तो पाहिला.
Image credits: facebook
Marathi
सालार सिनेमाचा धुमाकूळ
प्रभासचा नुकताच 'सालार' सिनेमा प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाने पहिल्याच दिवशी 100 कोटी रूपयांपेक्षा अधिक कमाई केली आहे.
Image credits: Facebook
Marathi
डंकी सिनेमाला टक्कर
प्रभासच्या 'सालार'ने 'डंकी' सिनेमाला टक्कर दिली आहे. सालारच्या कारणास्तव 'डंकी' सिनेमाची दुसऱ्या दिवशीची कमाई घसरली आहे.
Image credits: Twitter
Marathi
29 सिनेमांमध्ये केलेयं काम
दाक्षिणात्य स्टार प्रभासने आतापर्यंत 29 सिनेमांमध्ये काम केले आहे. यापैकी काही सिनेमे सुपरहिट ठरले आहेत.