सलमान खानची हत्या करायची नव्हती...तरीही का केला गोळीबार आणि किती मिळाले पैसे? आरोपींनी केला हा मोठा खुलासा

| Published : Apr 18 2024, 08:17 AM IST / Updated: Apr 18 2024, 08:24 AM IST

Salman Khan home shootout case

सार

Firing at Salman Khan’s House: अभिनेता सलमान खान याच्या मुंबईतील घरावर गोळीबार करण्यात आलेल्या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे. यामुळे मुंबई गुन्हे शाखेला मोठे यश मिळाल्याचे बोलले जातेय. अटक करण्यात आलेले आरोपी 24 आणि 21 वर्षाचे आहेत.

Salman Khan House Firing : बॉलिवूडमधील अभिनेता सलमान खान याच्या घरावर 14 एप्रिलला काही अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला होता. या प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेकडून दोघांना ताब्यात घेण्यात आले. सध्या आरोपींची चौकशी केली जात आहे. यावेळी असे समोर आलेय की, आरोपींना सलमान खान याची हत्या करायची नव्हती. केवळ त्याला भीती दाखवायची होती. दोघेही आरोपी बिहारमध्ये राहणारे आहेत. या दोघांच्या कुटुंबातील सदस्यांचा जबाब देखील नोंदवण्यात आला आहे.

याशिवाय आरोपींनी सलमान खानच्या पनवेल येथील फार्महाउसचीही रेकी केल्याचे गुन्हे शाखेला मिळाली आहे. दोघांनी लॉरेंन्स बिश्नोईच्या सांगण्यावरून सलमानच्या घरावर गोळीबार केला होता.

आरोपींना गुजरात येथून अटक
बिहारमधील चंपारण येथील स्थानिक असलेल्या विक्की गुप्ता आणि सागर पाल यांना सोमवारी (15 फेब्रुवारी) रात्री उशिरा गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील माता नो माध गावातून ताब्यात घेण्यात आले. दोघांचे वय 24 आणि 21 वर्ष आहे. तपासातून असे समोर आलेय की, आरोपींनी पैशांसाठी सलमानच्या घरावर गोळीबार केला होता. गुजरात पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हटले की, गुप्ता आणि पाल या दोघांना तुरुंगात बंद असलेल्या कुख्यात गुंड लॉरेंन्स बिश्नोईच्या टोळीने सलमानच्या घरावर गोळीबार करण्याचे काम सोपवले होते.

वांद्रे येथी ताज हॉटेलजवळ आरोपींना पाहिले गेले
मुंबई पोलिसांच्या एका अधिकाऱ्यांनी सांगितले की, दोन्ही आरोपींना 29 फेब्रुवारी ते 1 मार्चदरम्यान सलमानच्या घरापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या वांद्रे येथील ताज हॉटेलजवळ पाहिले होते. आरोपी पाल दोन वर्ष हरियाणात राहिला होता. यावेळीच पाल बिश्नोई टोळीच्या संपर्कात आल्याचा संशय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. त्यानंतर गुप्ता टोळीशी जोडला गेला.

नक्की काय घडले?
सलमान खानच्या घरावर रविवारी पहाटे पाच वाजता बाइकवरून आलेल्या दोघांनी गोळीबार केला. यावेळी आरोपींनी पाच राउंड फायरिंग केले. प्राथमिक तपासात असे समोर आलेय की, बाइकवर मागे बसलेल्या पालने सलमानच्या घरावर गोळीबार केला.

हरियाणातून एकाला अटक
सलमान खानच्या घरावर गोळीबार झाल्याच्या प्रकरणात आणखी एकाला हरियाणातून अटक करण्यात आली आहे. याबद्दलची माहिती पोलिसांनी बुधवारी (17 एप्रिल) दिली आहे. एका अधिकाऱ्यांनी सांगितले की, संशयिताचा संबंध अटक करण्यात आलेल्या आरोपींसोबत आहे. तो घटनेआधी आरोपींसोबत सातत्याने संपर्कात होता. हरियाणातून अटक करण्यात आलेल्या एकाचा संबंध तुरुंगात बंद असलेल्या लॉरेंन्स बिश्नोईचा लहान भाऊ अनमोल बिश्नोईकडून त्याने गाइडलाइन्स घेतल्याचा संशय आहे.

सूरतला जाऊन आरोपींनी फोनमधील सिम कार्ड बदलले
अधिकाऱ्यांनी म्हटले की, आरोपी सागर पाल आणि विक्की गुप्ता आपल्या हालचालींबद्दलची माहिती एका संशयिताला सातत्याने देत होते. यावेळी फोनवरील इंटरनेटचा वापर करत होते. घटनेनंतर पाल आणि गुप्ता यांनी मुंबईतून पळ काढत भूजच्या दिशेने गेले. सूरतजवळ आरोपींनी मोबाइलमधील सिम कार्ड बदलले, ज्याच्या माध्यमातून ते सातत्याने संपर्क करत होते.

गोळीबार करण्यासाठी मिळाले होते लाखो रुपये
आरोपी पाल आणि गुप्ताला सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्यासाठी जवळजवळ लाख रुपये मिळाले होते. याशिवाय काम पूर्ण झाल्यानंतर अधिक पैसे मिळतील असे आश्वासनही देण्यात आले होते.

आणखी वाचा : 

सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोघांना अटक, गुन्हे शाखेने असा लावला आरोपींचा छडा

या Celebs ला मिळालीय जीवे मारण्याची धमकी, दुसरे नाव ऐकून धक्का बसेल