सार

Firing On Salman House : बॉलिवूडमधील अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करण्यात आल्याच्या प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे.

Bollywood : बॉलिवूडमधील अभिनेता सलमान खान (Salma Khan) याच्या मुंबईतील घरावर गोळीबार करण्यात आला होता. या प्रकरणानंतर खळबळ उडाली होती आणि पोलिसांचा कठोर बंदोबस्तही अभिनेत्याच्या घराबाहेर लावण्यात आला होता. या प्रकरणात गुन्हे शाखेला आता मोठे यश मिळाले आहे. गुन्हे शाखेच्या टीमने दोघांना गुजरातमधील (Gujrat) भूज येथून ताब्यात घेतले आहे. पोलिसांची काही पथके आरोपींचा शोध घेत होते. अखेर दोघांना अटक करण्यात आली आहे.

मुंबई गुन्हे शाखेला मोठे यश
सलमानच्या घरावर गोळीबार केल्याच्या प्रकरणात दोन जणांना अटक करण्यात आली आहे. यामुळे मुंबई गुन्हे शाखेला (Mumbai Crime Branch) मोठे यश मिळाले आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, दोन्ही आरोपींना मंगळवारी (16 मंगळवारी) मुंबईत आणले जाणार आहे. यानंतर दोघांची अधिक चौकशी केली जाईल.

नक्की काय घडले होते?
अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर बाइकवरून आलेल्या दोघांनी रविवारी (14 एप्रिल) गोळीबार केला होता. गोळीबार केल्यानंतर दोघांनी घटनास्थळावरून पळ काढला. यानंतर मुंबई पोलिसांकडून आरोपींचा शोध घेण्यास सुरूवात झाली. कुख्यात गुंड लॉरेंन्स बिश्नोईसंबंधित काहीजणांची नावे समोर आली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोन्ही आरोपींना गुजरातमधील भूजच्या माता मढ येथून ताब्यात घेतले आहे. (Salman Khancha gharavar golibar prakarnat doghana atak) 

याशिवाय आरोपी महिनाभर नवी मुंबईतील पनवेल परिसरात एका भाड्याच्या घरात राहत होते. याच परिसरात सलमान खान याचे एक फार्महाउसही आहे. पोलिसांनी या घटनेसंबंधित सकाळच्या वेळेस नवी मुंबईतील तीन जणांची चौकशी केली होती. त्यामध्ये घरमालक, गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेल्या बाइकचा आधीचा मालक, बाइक विक्रीची सुविधा देणारा एजेंट आणि तपासासाठी अन्य काहीजणांचा समावेश होता. आता पोलिसांनी दोन आरोपींना गुजरात येथून अटक केली आहे.

आणखी वाचा :

Salman Khan : असा झाला भाईजानच्या घरा समोर गोळीबार

खळबळ जनक! सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार, ४ राउंड फायर; सलमानच्या सुरक्षेत वाढ