सार

Salman Khan Firing : बॉलिवूडमधील अभिनेता सलमान खानच्या घरावर 14 एप्रिलला पहाटेच्या वेळेस गोळीबार करण्यात आला. या प्रकरणात सध्या दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. अशातच सलमानच्या घरावर करण्यात आलेल्या गोळीबाराची लिंक पोर्तुगालमध्ये लागली आहे. 

Salman Khan firing case update : अभिनेता सलमान खान याच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणात दररोज नवे खुलासे होत आहेत. या प्रकरणातील दोन संशयितांनी घटनेआधी सलमान खानच्या पनवेल येथील फार्महाउसची रेकीही केल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. अशातच आता आणखी एक खुलासा झालाय की, सलमान खानच्या घरावर गोळीबाराच्या प्रकरणाची लिंक थेट पोतुर्गालमध्ये (Portugal) लागल्याचे बोलले जात आहे. 

अनमोल बिष्णोईने घेतली घटनेची जबाबदारी
रिपोर्ट्सनुसार, सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याच्या प्रकरणाची जबाबदारी कुख्यात गुंड लॉरेंन्स बिष्णोई याचा भाऊ अनमोल बिष्णोई याने घेतली आहे. अनमोल बिष्णोई नावाचे फेसबुक अकाउंट गोळीबार करण्याच्या तीन तास आधी समोर आले होते. पोलिसांनी माहिती देत सांगितले की, या पोस्टचा इंटरनेट प्रोटोकॉल (IP) पोर्तुगालमधील असल्याचे समोर आले आहे. ही पोस्ट VPN च्या माध्यमातून अपलोड करण्यात आली होती.

गोळीबाराआधी करण्यात आली होती पोस्ट
पोस्टमध्ये असे म्हटले होते की, "सलमान खानसाठी पहिला आणि अखेरचा इशारा आहे. यापुढे रिकाम्या घरावर अथवा भिंतीवर गोळीबार केला जाणार नाही. सलमान खान तुला ट्रेलर दाखवण्यासाठी गोळीबार केला होता. यामुळे तुला आमच्या क्षमतेबद्दल कळलेच असेल." खरंतर, हिंदी भाषेत सलमानच्या विरोधात पोस्ट शेअर करण्यात आली होती. सध्या पोलिसांकडून या पोस्टसंदर्भात अधिक तपास केला जात आहे.

आरोपी सागर पालने घेतली होती गोळीबाराची ट्रेनिंग
सलमान खान याच्या घरावर गोळीबार करण्यासाठी आरोपी सागर पालने गोळीबार कसा करायचा याची ट्रेनिंग बिहारमधील पश्चिम चंपारन जिल्ह्यात घेतली होती. याशिवाय मुंबईतील सलमान खानच्या घरावर गोळीबाराआधी त्याच्या पनवेलच्या घराजवळ चार ते पाच दिवस रेकीही केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सीसीटीव्ही फुटेज कसून पाहायत पोलीस
पोलिसांकडून सध्या गोळीबारातील प्रकरणाचे पुरावे जमा केले जात आहेत. याशिवास सलमान खानच्या पनवेल येथील फार्महाउसच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही कसून पाहिले जात आहेत. पोलिसांनी म्हटले की, बिहारमध्ये राहणाऱ्या दोन्ही आरोपींनी सलमान खानच्या फार्म हाउसची रेकी केली होती. आरोपींना गुजरातमधील भूज येथून ताब्यात घेण्यात आले आहे. याशिवाय आरोपींनी आपला गुन्हा स्विकार केला आहे.

आणखी वाचा : 

सलमान खानची हत्या करायची नव्हती...तरीही का केला गोळीबार आणि किती मिळाले पैसे? आरोपींनी केला हा मोठा खुलासा

सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोघांना अटक, गुन्हे शाखेने असा लावला आरोपींचा छडा