Ruturaj Singh Died : टेलिव्हिजनवरील 'अनुपमा' मालिकेतील स्टार ऋतुराज सिंह यांचे कार्डिअ‍ॅक अरेस्टने निधन

| Published : Feb 20 2024, 12:10 PM IST / Updated: Feb 20 2024, 12:13 PM IST

Ruturaj Singh Died

सार

टेलिव्हिजनवरील मालिका ‘अनुपमा’ स्टार ऋतुराज सिंह यांचे कार्डिअ‍ॅक अरेस्टने निधन झाले आहे. ऋतुराज सिंह 59 वर्षांचे होते.

Ruturaj Singh Died : टेलिव्हिजनवरील मालिका ‘अनुपमा’ मधील स्टार ऋतुराज सिंह यांचे वयाच्या 59 वर्षी निधन झाले आहे. ऋतुराज यांच्या एका जवळच्या मित्राने त्यांच्या निधनाची बातमी दिली आहे. ऋतुराज सिंह यांचे कार्डिअ‍ॅक अरेस्टने (Cardiac Arrest) निधन झाल्याने त्यांनी म्हटले आहे. ऋतुराज सिंह यांच्या निधनाने मनोरंजन सृष्टीत शोककळा पसरली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्या दीर्घकाळापासून ऋतुराज स्वादुपिंडाशी संबंधित समस्यांनी त्रस्त होते. काही दिवसांपूर्वीच ऋतुराज यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर ते घरी परतले होते. दरम्यान, घरी आल्यानंतर त्यांना हृदयासंबंधित समस्या निर्माण झाल्याने त्यांचे निधन झाले.

ऋतुराज सिंह यांचा मनोरंजन सृष्टीतील प्रवास
दिग्दर्शक रोहित शेट्टी यांची वेब सीरिज 'इंडियन पोलीस फोर्स'मध्ये ऋतुराज सिंह झळकले होते. या सीरिजमध्ये ऋतुराज यांनी विलनची भुमिका साकारली होती. याशिवाय टेलिव्हिजनवर 'बनेगी अपनी बात', 'ज्योति', 'हिटलर दीदी', 'थपथ', 'आहट', 'दीया और बाती हम', 'लाडो 2' सारख्या काही मालिकांमध्येही ऋतुराज सिंह यांनी काम केले होते. याशिवाय रुपा गांगुली आणि गौरव खन्ना यांचा शो ‘अनुपमा’ मध्ये देखील ऋतुराज सिंह झळकले होते.

आणखी वाचा : 

Suhani Bhatnagar : 'दंगल' फेम सुहानी भटनागरचे निधन, वयाच्या 19व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

बॉलिवूडमधील सर्वाधिक महागडा कलाकार, या सिनेमासाठी घेतले 275 Cr

सोनम कपूरच्या आलिशान घराचे Inside Photos पाहिलेत का?