सार
रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक मोगल रामोजी राव यांचे शनिवारी (08 जून) निधन झाले आहे. हैदराबाद येथील स्टार रुग्णालयात रामोजी राव यांच्यावर उपचार सुरू होते. सातत्याने बिघडत चाललेल्या प्रकृतीमुळे 5 जूनला रामोजी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
Ramoji Rao Passes Away : ईनाडु आणि रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचे शनिवारी पहाटे निधन झाले आहे. रामोजी राव 87 वर्षांचे होते आणि गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. रामोजी राव यांच्यावर हैदराबाद येथील स्टार रुग्णालयात उपचार सुरु होते. सातत्याने रामोजींची प्रकृती खालावली जात असल्याने 5 जूनला त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले. रामोजींना हृदयासंबंधित समस्या आणि श्वास घेण्यास त्रास होत होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ट्विट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामोजी राव यांच्या निधावर दु:ख व्यक्त केले आहे. पंतप्रधान मोदींनी म्हटले की, रामोजी राव यांच्या निधनामुळे अत्यंत दु:खी झालो आहे. रामोजी राव दूरदर्शी असण्यासह त्यांनी भारतीय मीडियामध्ये क्रांती घडवून आणली. रामोजींनी पत्रकारिता आणि सिनेसृष्टीत आपला एक वेगळाच ठसा उमटवला आहे. अशा आशयाची एक मोठी पोस्ट सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म 'X'वर पंतप्रधानांनी शेअर केली आहे.
कोण होते रामोजी राव?
रामोजी राव एक यशस्वी व्यावसायिक, निर्माते आणि मीडिया टायकून होते. तेलुगु मीडियामध्ये रामोजी राव यांच्या उल्लेखनीय योगदानामुळे त्यांना ओखळले जाते. त्यांचे पूर्ण नाव चेरूकुरी रामोजी राव होते. रामोजींचा जन्म 16 नोव्हेंबर 1936 रोजी एका मध्यमवर्गीय परिवारात झाला होता.
पद्मविभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलेल्या रामोजींनी हैदराबाद येथे रामोजी ग्रुपची स्थापना केली होती. हा ग्रुप जगातील सर्वाधिक मोठा फिल्म स्टुडिओ, रामोजी फिल्म सिटी, ईटीव्ही नेटवर्क आणि फिल्म प्रोडक्शन कंपनी उषा किरण मूव्हीजचा समावेश आहे.
आणखी वाचा :
अक्षय कुमार ते दिग्दर्शक अनुभव सिन्हा नव्हे 'या' व्यक्तींच्या प्रेमात वेडी होती Shilpa Shetty
'डेली सोप क्वीन' एकता कपूरच्या 8 महाफ्लॉप मालिका, लिस्ट ऐकून म्हणाल...