अक्षय कुमार ते दिग्दर्शक अनुभव सिन्हा नव्हे 'या' व्यक्तींच्या प्रेमात वेडी होती Shilpa Shetty

| Published : Jun 08 2024, 06:30 AM IST / Updated: Jun 08 2024, 07:54 AM IST

Shilpa Shetty

सार

शिल्पा शेट्टी आज (8 जून) तिचा वाढदिवस साजरा करत आहे. अशातच शिल्पा शेट्टीच्या आयुष्यातील अशा व्यक्तींबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांच्या प्रेमात ती पार बुडाली होती.

Shilpa Shetty Birthday : हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अदांनी प्रेक्षकांची मन जिंकणारी अभिनेत्री शिल्पा शेट्टीची आज एक वेगळी ओखळ आहे. खरंतर, शिल्पा शेट्टी खासगी आयुष्यासह प्रोफेशनल आयुष्यातील काही गोष्टींमुळेही नेहमीच चर्चेत असते. अशातच आज (8 जून) शिल्पा शेट्टीचा वाढदिवस आहे. शिल्पा शेट्टीचा जन्म कर्नाटकातील मँगलोर शहरात झालाय. शिल्पा शेट्टीच्या वाढदिवसानिमित्त तिच्या अफेअर्सबद्दलचे काही किस्से जाणून घेणार आहोत. याशिवाय कोणत्या व्यक्तींसोबत शिल्पा शेट्टीचे नाव जोडले गेले हे देखील पाहणार आहोत.

अक्षय कुमार सोबतच्या अफेअरच्या चर्चा
शिल्पा शेट्टीच्या लव्ह लाइफबद्दल ज्यावेळी बोलले जाते तेव्हा सर्वप्रथम नाव अक्षय कुमारचे येते. शिल्पा शेट्टी आणि अक्षय कुमारचे रिलेशनशिप बॉलिवूडमध्ये फार चर्चेत राहिले होते. असे म्हटले जाते की, दोघांच्या अफेअरची सुरुवात 'मैं खिलाडी तू अनाडी' सिनेमापासून झाली होती.

खरंतर, शिल्पा शेट्टीसोबत अक्षयचे नाव जोडले गेले असता अभिनेता त्यावेळी ट्विंकल खन्नाला देखील डेट करत होता. ज्यावेळी शिल्पा शेट्टीला अक्षयच्या ट्विंकलसोबतच्या रिलेशनशिपबद्दल कळले असता ती त्याच्यापासून दूर झाली. अशातच अक्षय आणि शिल्पाचे नाते मोडले गेले.

अनुभव सिन्हांसोबत जोडले गेले नाव
दिग्दर्शक अनुभव सिन्हांसोबतही शिल्पा शेट्टीचे नाव जोडले गेले. दोघेजण 'दस' सिनेमाच्यादरम्यान एकमेकांच्या जवळ आले होते. त्यावेळी अनुभव यांचा आधीच विवाह होण्यासह एका मुलाचे वडील होते.

सलमान खानचेही नाव
बॉलिवूडमधील दबंग म्हणजेच सलमान खान आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांच्यामध्ये अधिक जवळीकता असल्याच्याही चर्चा रंगल्या होत्या. याबद्दची कबूली खुद्द शिल्पाने दिली होती. शिल्पाने म्हटले होते की, आम्ही दोघे एकमेकांच्या फार जवळ असून प्रत्येक सुख-दु:खात एकत्रित राहिलो आहोत. असे सांगितले जाते की, शिल्पा शेट्टीला सलमान खान आवडायचा. पण शिल्पा आणि सलमानची मैत्री सर्वांना नेहमीच आवडते.

अखेर राज कुंद्रासोबत अफेअर आणि लग्न
शिल्पा शेट्टीच्या अफेअर्सची चर्चा नेहमीच व्हायची. पण अखेर शिल्पाने व्यावसायिक राज कुंद्राला डेट केले. या दोघांनी वर्ष 2009 मध्ये एकमेकांशी लग्न गाठ बांधली. खरंतर, शिल्पा शेट्टी राज कुंद्राची दुसरी पत्नी आहे.

आणखी वाचा : 

'डेली सोप क्वीन' एकता कपूरच्या 8 महाफ्लॉप मालिका, लिस्ट ऐकून म्हणाल...

'केवळ 4 तास झोपायचा', Chandu Champion सिनेमासाठी कार्तिक आर्यनने अशी केली तयारी