राखी सावंतने EX पतीचा अश्लील व्हिडीओ केला लीक, अभिनेत्रीला अटक होणार?

| Published : Apr 23 2024, 10:24 AM IST / Updated: Apr 23 2024, 10:27 AM IST

rakhi sawant

सार

Entertainment : राखी सावंतचा एक्स पती आदिल दुर्रानीने गेल्या काही महिन्यांपूर्वीच सोमी खान हिच्याशी विवाह केला. दुसऱ्या बाजूला राखी सावंतसोबत आदिलचे वाद सुरू आहेत. अशातच राखी सावंतने एक्स पतीचा अश्लील व्हिडीओ लीक केल्याचा तिच्यावर आरोप लावण्यात आलाय.

Rakhi Sawant's leaked video controversy : राखी सावंतने (Rakhi Sawant) एक्स पती आदिल दुर्रानीचा (Adil Durrani) अश्लील व्हिडीओ लीक केल्याने तिच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. सुप्रीम कोर्टाने सोमवारी (22 एप्रिल) या प्रकरणात एक महत्त्वाचा निर्णय सुनावला आहे. कोर्टाने राखी सावंतची मदत याचिका फेटाळून लावत तिला चार आठवड्यांमध्ये कनिष्ठ न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. अन्यथा राखी सावंतला अटक केली जाऊ शकते. अशातच दुबईत मजामस्ती करणाऱ्या राखी सावंतला सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर भारतात परत यावे लागणार आहे.

राखी सावंतने मागितला होता अटकपूर्व जामीन
आदिलचा अश्लील व्हिडीओ लीक केल्याप्रकरणात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करत अटकपूर्व जामीनाची मागणी केली होती. जेणेकरुन अटकेपासून दूर राहता येईल. कोर्टाने राखीच्या याचिकेवर सुनावणी करत अटकपूर्व जामीन फेटाळून लावला. याशिवाय कोर्टाने आपल्या निर्णयात राखीला चार आठवड्यांमध्ये कनिष्ठ न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. याआधीही राखी सावंतचा अटकपूर्व जामीन मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावला होता.

नक्की काय आहे प्रकरण?
आदिल दुर्रानीने राखी सावंतच्या विरोधात कोर्टात धाव घेतली होती. खरंतर राखीने आदिलचे अश्लील आणि खाजगी व्हिडीओ ऑनलाइन शेअर केले होते. आदिलने आपल्या एफआयआरमध्ये असाही दावा केला होता की, टेलिव्हिजनवर एका टॉक शोवेळी राखीला माझा व्हिडीओ तेथे दाखवण्याची परवानगीही दिली नव्हती. (Adil Durrani Cha Video Leak kelyamule Rakhi Sawantla Atak Honr Ka?) 

राखी सावंतच्या टीमने काय म्हटले?
राखी सावंतच्या टीमने म्हटले की, ज्या व्हिडीओवरून आदिलने कोर्टात खटला दाखल केला आहेत त्यामध्ये सेक्शुअल गोष्टी दाखवून देणे कठीण आहे. याशिवाय व्हिडीओ पाच वर्ष जुना असून त्याची क्वालिटीही वाईट आहे. राखीने चौकशीपासून दूर राहण्यासाठी असा दावा केलाय की, मी सध्या वैद्यकीय समस्यांचा सामना करतेय आणि सर्जरीची गरज आहे.

आदिलच्या बाजूने कायदेशीर लढाई सुहैल शरीफ आणि हाजी शैफ शेख यांच्याकडून लढली जात आहे. या दोघांचे असे म्हणणे आहे की, राखी सावंत जोपर्यंत घटनेसंबंधितचा फोन तपास अधिकाऱ्यांना देत नाही तोवर तिच्या अटकपूर्व जामीनाच्या विरोधात लढाई सुरू राहिल. आदिलची टीम असेही म्हणतेय, त्याची प्रतिमा मलील होऊ नये म्हणून व्हिडीओ हटवावा.

आणखी वाचा : 

सिनेसृष्टीतील सर्वाधिक टॅक्स भरणारे कलकार, या TV स्टारचेही नाव

बॉलिवूडमधील या सिनेमांवर परदेशात बंदी, दुसरे नाव ऐकून बसेल धक्का