सार

96 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याचे आयोजन हॉलिवूच्या डॉल्बी थिएटरमध्ये करण्यात आले आहे. याच दरम्यान, एक व्हिडीओ समोर आला असून त्यामध्ये जॉन सीना न्यूड झाल्याचे दिसून येत आहे. जॉन सीनाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Oscars 2024 : जगभरातील प्रसिद्ध पुरस्कार सोहळा ऑस्कर 2024 चे आयोजन लॉस एंजलिसमधील डॉल्बी थिएटरमध्ये करण्यात येत आहे. प्रत्येक वर्षी ऑस्करवेळी काहीतरी हटके गोष्टी पाहायला, ऐकायला मिळतात. यंदाच्या ऑस्करवेळचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये रेस्लर आणि हॉलिवूड अभिनेता जॉन सीना (John Cena) न्यूड झाल्याचे दिसून येत आहे. जॉन सीनाचा न्यूड लुक पाहून सर्वजण हैराण झाले आहेत.

जॉन सीनाचा लुक पाहून सर्वजण हैराण
ऑस्करच्या मंचावर जॉन सीनाला न्यूड पाहून सर्वजण हैराण झालेच. पण आता जॉन सीनाच्या या लुकची जगभरात चर्चा होऊ लागली आहे. खरंतर, जॉन सीना ऑस्कर सोहळ्यासाठी कॉस्ट्युम डिझाइनच्या पुरस्काराची घोषणा करण्यासाठी मंचावर आला होता. जॉन सीनाचा न्यूड व्हिडीओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून नेटकऱ्यांकडून त्यावर प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.

या कलाकारांना मिळाला ऑस्कर पुरस्कार
ऑस्कर पुरस्कार सोहळ्यावेळी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्यासाठी रॉबर्ट डाउनी ज्यूनिअर याला 'ओपेनहाइमर' सिनेमासाठी पुरस्कार दिला गेला. याशिवाय सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री म्हणून दा वाइन जॉय रॅंडोल्फला 'होल्डओव्हर्स' सिनेमासाठी पुरस्कार मिळाला. अशाप्रकारे द बॉय अ‍ॅण्ड हेरॉनला बेस्ट अ‍ॅनिमेटेड फिचर फिल्म, 'ओपेनहाइमर' सिनेमाला बेस्ट सिस्टोग्राफी, 'प्युअर थिंगला' बेस्ट कॉस्ट्युम डिझाइन आणि 'ओपोनहाइमर' सिनेमाला बेस्ट फिल्म एडिंगचा पुरस्कार मिळाला आहे.

आणखी वाचा : 

Oscars 2024 च्या मंचावर कला दिग्दर्शक नितिन देसाई यांना वाहिली श्रद्धांजली

Naach G Ghuma Teaser : प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक बाई असते आणि...., मराठीतील आगामी सिनेमा 'नाच गं घुमा' सिनेमाचा टीझर प्रदर्शित

दीपिका आणि रणवीरच्या घरी लवकरच होणार चिमुकल्या बाळाचे आगमन, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत कपलने दिली आनंदाची बातमी