BBOTT3 मधून एक्झिट घेतल्यानंतर अरमान मलिकच्या पहिल्या पत्नीने केले धक्कादायक खुलासे, म्हणाली- मी कायदेशीर पत्नी कृतिका तर...

| Published : Jul 02 2024, 11:15 AM IST / Updated: Jul 02 2024, 11:22 AM IST

Payal Malik
BBOTT3 मधून एक्झिट घेतल्यानंतर अरमान मलिकच्या पहिल्या पत्नीने केले धक्कादायक खुलासे, म्हणाली- मी कायदेशीर पत्नी कृतिका तर...
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

बिग बॉस ओटीटी-3 मधून पहिल्याच विकेंड का वारच्या वेळी घरातून युट्यूबर अरमान मलिकची पहिली पत्नी पायल मलिकने एक्झिट घेतली. घरातून बाहेर पडल्यानंतर पायलने एका मुलाखतीत काही धक्कादायक खुलासे केले आहेत.

Payal Malik Exit From BBOTT 3 : प्रसिद्ध युट्युबर अरमान मलिकने त्याच्या दोन पत्नी पायल मलिक आणि कृतिका मलिकसोबत बिग बॉस ओटीटीच्या तिसऱ्या सीझनमध्ये एण्ट्री केली. तेव्हापासून तिघेही चर्चेत आहेत. दरम्यान, पायलने नुकतीच बिग बॉसच्या घरातून एक्झिट घेतल्याने मलिकचे चाहते नाराज झाले. रिअ‍ॅलिटी शो मधून बाहेर आल्यानंतर पायलने आपले लग्न, अरमानची दुसरी पत्नी कृतिकासोबतचे तिचे नातेसंबंध आणि दुसऱ्या पत्नीचा निर्णय घेत कशाप्रकारे चुकीची वागणूक केल्यासह अन्य काही खुलासे केले आहेत. पायल मलिकने असाही खुलासा केला की, मी अरमान मलिकची कायदेशीर पत्नी आहे.

काय म्हणाली पायल मलिक?
बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर पायल मलिकने इंडिया टुडेला एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत पायलने म्हटले की, आमच्या चाहत्यांना माहिती असेल कधीही एकापेक्षा अधिक लग्नाला पाठिंबा दिला जात नाही. आमचे व्लॉग्स असो अथवा मुलाखत, आम्ही कधीच दोन लग्नांना प्रोत्साहन दिलेले नाही. अरमानने जे काही चुकीचे केलेय ते भारतातील एखाद्या व्यक्तीने करावे असे मला वाटत नाही. मला असे वाटते की, एका महिलेसाठी तिच्या पतीने दोन लग्न करणे एक मोठे दु:ख असू शकते. पती दुसऱ्या पत्नीला घरी घेऊन आल्यास तर ही बाब कोणीही खपवून घेणार नाही.

पायलने पुढे म्हटले की, मी इस्लाम धर्म स्विकारलेला नाही. खरंतर, अरमान जाट परिवारातील असून पायल एक गुज्जर परिवारातील आहे. ज्यावेळी त्यांना हिंदू विवाह अधिनियमाबद्दल सांगण्यात आले तेव्हा एकापेक्षा अधिक कायदेशीर पत्नीला मान्यता नाही. यामुळे पायल म्हणतेय की, मीच अरमानची कायदेशीर पत्नी आहे.

अरमानचे कृतिकासोबतच्या लग्नाबद्दल पायलचे मत
पायल मलिकने अरमान आणि कृतिका अरमानच्या लग्नावरुनही भाष्य केले. पायलने म्हटले की, “कृतिका आणि अरमान यांचे लग्न कायदेशीर नाही. जोपर्यंत मला माहितेय की, पहिल्या पत्नीला आपल्या पतीने दुसऱ्या पत्नीसोबत लग्न करण्यास काहीही हरकत नाही तर कोणतीही समस्या उद्भवत नाही.”

पायल मलिकचे धक्कादायक खुलासे
इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत पायल मलिकने म्हटले की, “अरमानसोबत लग्न करण्यासाठी माझे घर सोडले. आठ वर्षे त्याच्यावर अवलंबून होती. मी अरमानसोबतच राहत होती आणि अचानक एखादा व्यक्ती अरमानच्या आयुष्यात येतो. खरंतर, ही बाब चुकीचीच आहे. अरमानने विश्वासघात केल्यानंतरही त्याच्या सोबत राहतेय असेही पायलने म्हटले. मला चिरायु नावाचा मुलगा आहे. जो अरमानच्या दुसऱ्या महिलेसोबतच्या लग्नाला स्विकार करण्याचे आणखी एक कारण ठरले. या सर्व गोष्टीनंतर अरमानपासून एक वर्ष मुलाला घेऊन दूर राहिली. पण काही समस्यांचा सामना करावा लागला. आता सर्वकाही ठिक असून आम्हि तिघेही एकाच परिवारात शांतपणे राहत आहोत.”

आणखी वाचा : 

BBOTT3 मधून अरमान मलिकच्या पहिल्या पत्नीची एक्झिट, पण पती का आनंदित

प्रभासच्या Kalki 2898 AD सिनेमाने USA मध्ये मोडला शाहरुखचा रेकॉर्ड, पठाण आणि जवानपेक्षा केली वरचढ कमाई