प्रभासच्या Kalki 2898 AD सिनेमाने USA मध्ये मोडला शाहरुखचा रेकॉर्ड, पठाण आणि जवानपेक्षा केली वरचढ कमाई

| Published : Jul 02 2024, 07:47 AM IST / Updated: Jul 02 2024, 07:48 AM IST

Kalki 2898 AD Book My Show

सार

‘कल्कि 2898 एडी’ सिनेमा बॉक्स ऑफिसह वर्ल्डवाइड धुमाकूळ घालत असल्याचे दिसून येत आहे. हा सिनेमा लवकरच भारतातील पुढील 100 कोटी रुपये कमावणारा ठरु शकतो. ओव्हरसीज मार्केटमध्येही प्रभासचा सिनेमा एक नवा रेकॉर्ड करत असल्याचे दिसून येत आहे.

Kalki 2898 AD Movie Record : सुपरस्टार प्रभासचा सिनेमा ‘कल्कि 2898 एडी’ सिनेमागृहांमध्ये धुरळा उडवत आहे. सिनेमा प्रेक्षकांना पसंतीस उतरल्याने सध्या सर्वत्र त्याचीच चर्चा आहे. गुरुवारी (27 जून) प्रदर्शित झालेला सिनेमा पाहण्यासाठी पहिल्या दिवसापासून प्रेक्षक तुफान गर्दी करताना दिसून येत आहेत.

सोमवारी कल्कि सिनेमाची कमाई
प्रभासच्या कल्कि 2898 एडी सिनेमाने चार दिवसांमध्ये 500 कोटींपेक्षा अधिक कमाई केली. सिनेमाने 95 कोटी रुपयांची कमाई करत देशाअंतर्गत बॉक्स ऑफिसवर आपले खाते सुरु केले होते. रविवार (30 जून) पर्यंत सिनेमाची कमाई 50 कोटी रुपयांपेक्षा अधिक होती. चौथ्या दिवशी सिनेमाने 88 कोटी रुपयांहून अधिक पैसे कमावले. सोमवारी (1 जुलै) कल्कि 2898 एडी सिनेमाने सर्वाधिक कमी कमाई केली. कमाईत अर्ध्यापेक्षा अधिक घट झाल्याचे दिसून आले आहे.

ओव्हरसीज मार्केटमध्ये प्रभासचा जलवा
कल्कि 2898 एडी सिनेमा यंदाच्या वर्षात सर्वाधिक मोठी ओव्हरसीज कलेक्शन करणार असल्याचे दिसून येत आहे. खरंतर, फायटर सिनेमाचा रेकॉर्ड ब्रेक चार दिवस आधीच केला होता. आता विकेंडच्या कमाईपेक्षा सिनेमाने ओव्हरसीज मार्केटमध्ये शाहरुख खानच्या सिनेमांनाही मागे टाकले आहे.

वर्ष 2024 च्या सुरुवातीला आलेला हृतिक रोशनचा फायटर सिनेमाने 12 मिलियन डॉलरच्या (100 कोटी रुपयांहून अधिक) एकूण ओव्हरसीज कलेक्शन केले होते. मात्र कल्कि 2898 एडी सिनेमाने पहिल्याच तीन दिवसांमध्ये 13 मिलियन डॉलर (108 कोटी रुपयांहून अधिक) कमाई केली होती.

भारतीय सिनेमांचा सर्वाधिक मोठा ओव्हरसीज विकेंड कलेक्शन
नाग अश्विन यांनी दिग्दर्शित केलेल्या कल्कि 2898 एडी सिनेमाने विकेंडला बक्कळ कमाई करत शाहरुख खानचा ब्लॉकबस्टर्स सिनेमालाही मागे टाकले आहे. एवढेच नव्हे कल्कि 2898 एडी सिनेमाने खुद्द प्रभासचा ग्रँड हिट ठरलेला सिनेमा 'बाहुबली-2' चा देखील रेकॉर्ड ब्रेक केला आहे.

प्रभासच्या सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर सिनेमाने 17.77 मिलियन डॉलर (147.7 कोटी रुपये) कमाई केली आहे. यामध्ये USA आणि कॅनडात सिनेमाचे विकेंड कलेक्शन 11.2 मिलियन डॉलर आहे. म्हणजेच जवळजवळ 92.63 कोटी रुपये.

पठाण आणि जवान सिनेमापेक्षा वरचढ कमाई
भारतातील सर्वाधिक मोठा आंतरराष्ट्रीय स्टार मानल्या जाणाऱ्या शाहरुख खानचा गेल्या वर्षात आलेले ब्लॉकबस्टर सिनेमे 'पठाण' आणि 'जवान'ला देखील 'कल्कि 2898' एडी सिनेमाने मागे टाकले आहे.

USA/कॅनडात भारतीय सिनेमांचे टॉप-5 विकेंड कलेक्शन

  • कल्कि 2898 एडी सिनेमा 11.2 मिलियन डॉलर (92.63 कोटी रुपये)
  • बाहुबली-2 सिनेमा 10.43 मिलियन डॉलर (87 कोटी रुपये)
  • RRR सिनेमा 9.5 मिलियन डॉलर (79.28 कोटी रुपये)
  • पठाण सिनेमा 9.49 मिलियन डॉलर (79.19 कोटी रुपये)
  • जवान सिनेमा 7.49 मिलियन डॉलर (62.50 कोटी रुपये)

आणखी वाचा : 

Kalki 2898 AD Box Office : जगभरात 'कल्कि' सिनेमाचा डंका, या चार सिनेमांचा रेकॉर्ड ब्रेक करत रचला इतिहास

"हिंदुत्त्वाशी गद्दारी केलेल्यांना क्षमा नाही"... म्हणत 'धर्मवीर-2' सिनेमाची रिलीज डेट जाहीर, पाहा Photos