Panchayat Season 4 संदर्भात निर्मात्यांची मोठी घोषणा, प्रेक्षकांना एवढ्या भागापर्यंत घेता येणार मनोरंजनाची मजा

| Published : May 28 2024, 09:04 AM IST / Updated: May 28 2024, 09:07 AM IST

Panchayat Season 4 Update

सार

Panchayat Web Series : ओटीटी प्लॅटफॉर्मवरील वेब सीरिज पंचायचा तिसरा सीझन अद्याप प्रदर्शित करण्यात आलेला नाही, अशातच निर्मात्यांनी पंचायच्या चौथ्या सीझनसंदर्भात एक मोठी घोषणा केली आहे.

Panchayat Web Series Season 4 : ‘पंचायत’ वेब सीरिजच्या तिसऱ्या सीझनसंदर्भात प्रेक्षकांमध्ये फार उत्सुकता आहे. कॉमेडी-ड्रामा असणाऱ्या सीरिजचा तिसरा सीझन येत्या 28 मे ला अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर (Amazon Prime Video) प्रदर्शित होणार आहे. यामुळेच सीरिजची जोरदार चर्चा सुरू असण्यासह सोशल मीडियावर ट्रेण्डमध्ये आहे. नुकत्याच काही दिवसांआधी निर्मात्यांनी तिसऱ्या सीझनसंदर्भात काही खुलासे केले होते. निर्मात्यांनी म्हटले होतेकी, सीझन 3 मध्ये मनोरंजाचा डबल डोस असणार आहे. अशातच आता निर्मात्यांनी पंचायतच्या पुढील सीझनसंदर्भातही मोठे अपडेट दिले आहे.

पंचायतच्या चौथ्या सीझनसंदर्भात अपडेट
पंचायत वेब सीरिजचे दिग्दर्शक दीपक मिश्रा यांनी एका मुलाखतीत म्हटले की, “पंचायत सीझन 4 च्या स्क्रिप्टवर काम सुरू आहे. तिसरा सीझन आता पूर्ण झाला असून आम्ही चौथ्या सीझवर काम करण्यास सुरूवात केली आहे. आम्ही शो चे तीन ते चार एपिसोड लिहून ठेवले आहेत. पंचायत सीझन 4 संदर्भातील आमच्या कल्पना पूर्णपणे स्पष्ट आहेत.” याशिवाय सीरिजच्या निर्मात्यांचे असे म्हणणे आहे की, या सीरिजचे एकूण पाच भाग येणार आहेत. पहिला सीझन वर्ष 2020 मध्ये कोरोनाच्या वेळी प्रदर्शित झाला होता. दुसरा सीझन 2023 मध्ये लाँच केला होता.

View post on Instagram
 

पंचायत सीरिजची कथा
पंचायत वेब सीरिजची कथा अभिषेक कुमार त्रिपाठी नावाच्या व्यक्तीवर आधारित आहे. अभिषेक त्रिपाठीला इंजिनिअरिंगनंतर फुलेरा गावात ग्राम सचिवाच्या पदावर नोकरी मिळते. केवळ 20 हजार रुपये वेतन असल्यामुळे अभिषेक त्रिपाठी त्रस्त असतो. गावाच्या सचिवाला गावकरी हळूहळू आपलेसे मानतात आणि त्याच्या समस्यांचे समाधान करण्यासाठी प्रयत्न करतात. 

जीतेन्द्र कुमार यांनी अभिषेक त्रिपाठी आणि शाहरुखची केली तुलना
काही मुलाखतीत जीतेन्द्र कुमार यांनी पंचायतचे सचिव जी अभिषेक त्रिपाठी यांची तुलना 'स्वदेश' सिनेमातील मोहन भार्गव याच्यासोबत केली आहे. जीतेन्द्र कुमार यांना असे वाटते की, सचिव जी यांच्या भूमिकेत स्वदेशमधील शाहरुख खानची झलक दिसून येते.

आणखी वाचा : 

शाहरुख खानच्या 'लुट-पुट गया' गाण्यावर थिरकली अनन्या पांडे, पाहा KKR संघाच्या पार्टीचा धमाकेदार VIDEO

Amazon Prime च्या माध्यमातून सिनेमा Rent वर कसा घ्यायचा? जाणून घ्या शुल्कासह महत्त्वाची माहिती