सार

अ‍ॅमेझॉन प्राइमवरील सिनेमे रेंटवर घेण्यासंदर्भात बहुतांशजणांच्या मनात वेगवेगळे प्रश्न उपस्थितीत राहतात. अशातच अ‍ॅपच्या माध्यमातून सिनेमा रेंटवर कसा घ्यायचा, शुल्क किती याबद्दल जाणून घेऊया सविस्तर...

Amazon OTT Platform : ओटीटी प्लॅटफॉर्मचा ट्रेण्ड सध्या खूप वाढला आहे. भारतात अ‍ॅमेझॉन प्राइम, नेटफ्लिक्स, डिज्नी हॉटस्टार, सोनी लिव्हसह अन्य ओटीटी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याच्या माध्यमातून टीव्ही शो, वेब सीरिज पाहता येतात. पण नागरिकांना सब्सक्रिप्शन घ्यावे लागते. अशातच सध्या अ‍ॅमेझॉनवर सब्सक्रिप्शन घेतल्यानंतरही सिनेमा रेंटवर घ्यावा लागत असल्याचे अ‍ॅपमध्ये दाखवले जात आहे. खरंतर, ही सुविधा काय आहे याबद्दल जाणून घेऊया.

प्राइमवर सध्या मोठ्या संख्येने काही सिनेमे उपलब्ध आहेत जे रेंटवर घेता येतात. पण सिनेमा रेंटवर घेतल्यानंतर पहायचा कसा, किती दिवस पाहता येऊ शकतो अथवा वेगवेगळ्या सिनेमांसाठी रेंट वेगळे असू शकते का असे काही प्रश्न तुमच्या मनात असतीलच ना?

रेंटवर कसा घ्यायचा सिनेमा?
अ‍ॅमेझॉन प्राइमला सपोर्ट करणाऱ्या डिवाइसवर प्राइम व्हिडीओ वेबसाइटच्या मदतीने अथवा प्राइम व्हिडीओ अ‍ॅपच्या मदतीने सिनेमा रेंट करता येऊ शकतो.

रेंटवरील सिनेमा कसा कळणार?
प्राइम व्हिडीओ वेबसाइटवर जाऊन व्हिडीओ अ‍ॅपमध्ये कॅटलॉग ब्राउज करा. अथवा एखादे टायटल शोधण्यासाठी Search चा वापर करा. येथे तुम्हाला होम पेजवर पिवळ्या रंगातील शॉपिंग बॅगचा आयकॉन दिसेल. अशातच ज्यावेळी प्राइम व्हिडीओ प्लॅटफॉर्मवर एखाद्या सिनेमाच्या पोस्टरवर पिवळ्या रंगातील शॉपिंग बॅगचे साइन दिसेल त्यावेळी समजून जा सिनेमा रेंटवर आहे.

रेंट केलेले सिनेमे कुठे सेव्ह होतात?
एखादे टायटल खरेदी केल्यानंतर My Stuff मध्ये सेव्ह केले जाते. येथे तुम्हाला डाउनलोड अथवा स्ट्रिमिंगसाठी सिनेमा उपलब्ध होईल. पण लाइसेंसिंगच्या नियमासह अन्य काही कारणास्तव काहीवेळेस सिनेमा Unavailable देखील होऊ शकतो. एखादा सिनेमा रेंटवर घेतल्यास तो मर्यादित वेळासाठी तेथे सेव्ह केला जातो.

रेंटवर घेतलेला सिनेमा किती दिवस पाहता येतो? रेंटवर घेतलेला सिनेमा 30 दिवसांपर्यंत व्हिडीओ लायब्रेरीमध्ये सेव्ह असतो. दरम्यान, सिनेमा एकदा सुरू केल्यानंतर तो पाहण्यासाठी तुम्हाला 48 तासांचा कालावधी दिला जातो. याशिवाय काही सिनेमा पाहण्यासाठीचा कालावधी वाढवलेला असू शकतो.

आणखी वाचा : 

Jio Cinema ची नेटफ्लिक्स-अ‍ॅमेझॉनला टक्कर, कंपनीकडून 'या' धमाकेदार प्लॅनची घोषणा

तुम्हाला Income Tax ची आलीय? अशी तपासून पाहा खरी की खोटी