शाहरुख खानच्या 'लुट-पुट गया' गाण्यावर थिरकली अनन्या पांडे, पाहा KKR संघाच्या पार्टीचा धमाकेदार VIDEO

| Published : May 28 2024, 07:36 AM IST / Updated: May 28 2024, 07:58 AM IST

Ananya Pandey Dance in KKR Victory Celebration
शाहरुख खानच्या 'लुट-पुट गया' गाण्यावर थिरकली अनन्या पांडे, पाहा KKR संघाच्या पार्टीचा धमाकेदार VIDEO
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

अभिनेत्री अनन्या पांडेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये अभिनेत्री आंद्रे रसेलसोबत डान्स करताना दिसून येत आहे. खरंतर, केकेआरच्या संघाचा आयपीएलमध्ये विजय झाल्याने एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.

KKR Victory Celebration : 27 मे ला आयपीएलचा अंतिम सामना एम. ए. चिदंबरम स्टेडिअममध्ये खेळवण्यात आला. यावेळी सामना शाहरुख खानचा संघ केकेआर आणि एसआरएचमध्ये खेळवला गेला. यामध्ये केकेआरच्या संघाचा 8 विकेट्सने विजय झाला. अशातच केकेआरच्या संघाचा विजय झाल्याने एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान बॉलिवूडमधील अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Pandey) खेळाडू आंद्रे रसेल (Andre Russell) सोबत थिरकताना दिसली.

सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये अनन्या पांडे आंद्रे रसेलसोबत शाहरुख खानचा सिनेमा डंकीमधील गाणे 'लुट पुट गया' वर डान्स करताना दिसली. लाल रंगातील ऑफ शोल्डर हाय स्लिट गाउनमध्ये अनन्या पार्टीचा आनंद लुटताना दिसून येत आहे.

लुंगी डान्स गाण्यावर थिरकला श्रेयस अय्यर
केकेआर संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरचा (Shreyas Iyar) एक व्हिडीओ समोर आला होता. यामध्ये श्रेयस चेन्नई एक्सप्रेसमधील गाणे ‘लुंगी डान्स’ वर थिरकताना दिसला. याशिवाय सुयश रमनदीप सिंह, सुयश शर्मा, अभिषेक नायर आणि वरुण चक्रवर्ती 'देसी बॉइज' गाण्यावर डान्स करताना दिसले.

केकेआरच्या संघाला पाठिंबा
आयपीएलच्या संघाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी अनेकदा अनन्या कपूर क्रिकेटच्या मैदानात दिसली. आयपीएलच्या अंतिम सामना आणि क्वालिफायर वन मध्ये देखील सुहाना खानसोबत टीमला चीअर अप करतानाही अन्यना पांडे दिसली.

'कॉल मी बे' वेब सीरिजमध्ये दिसणार अनन्या
अनन्या पांडेच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास अखेरचा सिनेमा 'खो गए हम कहां' मध्ये झळकली होती. हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. सिनेमात सिद्धांत चतुर्वेदी, आदर्श गौरव आणि कल्कि कोचलिन यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. अशातच अभिनेत्री लवकरत 'कॉल मी बे' मध्ये झळकणार आहे.

अ‍ॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार सीरिज
अनन्याची आगामी सीरिज अ‍ॅमेझॉन प्राइमवर 6 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. यामध्ये वीर दास, गुरफतेह पीरजादा, वरुण सूद, विहान समत, मुस्कान जाफरी, निहारिका लायरा दत्त, लीसा मिश्रा आणि मिनी माथुरही सीरिजचा हिस्सा असणार आहेत.

आणखी वाचा : 

Amazon Prime च्या माध्यमातून सिनेमा Rent वर कसा घ्यायचा? जाणून घ्या शुल्कासह महत्त्वाची माहिती

Anant-Radhika 2nd Pre Wedding : दुसऱ्या प्री-वेडिंगसाठी पाहुण्यांची लगभग सुरू, सलमान खानही रवाना