सार

96 व्या ऑस्कर पुरस्कारावेळी जगभरातील कलाकारांचा गौरव करण्यात आला. या प्रतिष्ठित सोहळ्यात कला दिग्दर्शक नितिन देसाई यांना श्रद्धांजली वाहिली गेली.

Oscars 2024 :  96 व्या अकादमी पुरस्कारावेळी जगभरातील कलाकारांचा सन्मान करण्यात आला. या प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्यामध्ये ‘ओपनहाइमर’ आणि ‘बार्बी’ सिनेमाचे सर्वाधिक वेळा नाव प्रेक्षकांच्या कानी पडले. स्टेज परफॉर्मेन्स ते पुरस्कारासाठी या दोन्ही सिनेमांना गौरवण्यात आले. याशिवाय भारतीय कला दिग्दर्शक नितिन देसाई (Nitin Desai) यांना श्रद्धांजली वाहिली गेली.

नितिन देसाई यांना ऑस्कर सोहळ्यावेळी वाहिली श्रद्धांजली
ऑस्कर पुरस्कार 2024 च्या मंचावर ‘मेमोरियम सेगमेंट’ (Memoriam Segment) चालवण्यात आले. या दरम्यान, एका व्हिडीओमध्ये जगभरातील काही प्रसिद्ध चेहऱ्यांना त्यांच्या वारशासाठी सन्मानित करण्यात आले. यामध्येच नितीन देसाई यांचे नाव होते. स्क्रिनवर काही सेकंदासाठी नितिन देसाई यांचा फोटो झळकवण्यात आला. खरंतर नितिन देसाई यांचे सिनेसृष्टीतील योगदान पाहता त्यांना ऑस्करच्या मंचावर श्रद्धांजली वाहिली गेली.

‘पॅरासाइट’ अभिनेत्याला वाहिली श्रद्धांजली
ऑस्कर 2024 च्या मंचावर ‘पॅरासाइट’ (Parasite) सिनेमातील अभिनेता ली-सन-क्युन (Lee Sun-kyun) याला देखील श्रद्धांजली वाहिली गेली. दक्षिण कोरियातील अभिनेत्याचा फोटो स्क्रिनवर झळकवण्यात आला. गेल्या वर्षी 27 डिसेंबरला ली-सन-क्युन याचा मृत्यू झाला होता.

‘फ्रेंण्ड्स’ स्टारलाही वाहिली श्रद्धांजली
पुरस्कार सोहळ्यावेळी नितिन देसाई, ली-सुन-क्युन यांच्या व्यतिरिक्त ‘फ्रेंण्ड्स’ शोमधील स्टार मॅथ्यू पेरी, टीना टर्नर, अभिनेता रेयान ओ'नील, संगीत दिग्दर्शक रिचर्ड लुईस, अभिनेत्री ग्लेंडा जॅक्सन, हॅरी बेलाफोनेट, पी-वी हरमन अभिनेता पॉल रुबेंस, संगीतकार बिल ली, चिता रिवेरा, मेलिंडा डिलन, नॉर्मन ज्विसन, पाइपर लॉरी, ज्युलियन सॅण्ड्स, कार्ल वेदर्स, ट्रीट विलिअम्स आणि बर्ट यंग यांचाही समावेश होता.

कोण आहेत नितिन देसाई?
नितिन देसाई यांचे निधन गेल्या वर्ष 2 ऑगस्ट रोजी झाले. वयाच्या 57 व्या वर्षात नितिन देसाई यांना जगाचा निरोप घेतला होता. बॉलिवूडमध्ये नितीन यांची एक खास ओखळ होती. त्यांनी आपल्या करियरमध्ये काही बड्या सिनेनिर्मात्यांसोबत काम केले होते. यापैकी आशुतोष गोवारिकर, विधु विनोद चोप्रा, राजकुमार हिरानी आणि संजय लीला भंसाळी यांच्या नावाचा समावेश आहे.

आणखी वाचा : 

Dolly-Amandeep Sohi Death : बहिणीनंतर डॉली सोहीचे गर्भाशयाच्या कॅन्सरने निधन, मृत्यूनंतर अभिनेत्रीही इंस्टाग्रामवरील अखेरची पोस्ट व्हायरल

परिणीती चोप्रा आई होणार? विमानतळावरील लुकमुळे अभिनेत्रीच्या प्रेग्नेंसीच्या चर्चेला उधाण

'DON 3' सिनेमासाठी कियारा अडवाणीने घेतलीय एवढी फी, ऐकून व्हाल हैराण