नाताशा स्टेनकोविक आणि हार्दिक पांड्यामधील वाद मिटला? घटस्फोटाच्या अफवांनंतर अभिनेत्रीने ही दिली गूड न्यूज

| Published : Jun 03 2024, 02:04 PM IST

Natasa Stankovic-Hardik Pandya'
नाताशा स्टेनकोविक आणि हार्दिक पांड्यामधील वाद मिटला? घटस्फोटाच्या अफवांनंतर अभिनेत्रीने ही दिली गूड न्यूज
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

गेल्या काही दिवसांपासून हार्दिक पांड्या आणि नाताशा स्टेनकोविक यांच्यामध्ये घटस्फोट होणार असल्याच्या बातम्यांनी जोर पकडला होता. अशातच अभिनेत्रीने घटस्फोटाच्या अफवांना पूर्णविराम दिला आहे.

Natasha & Hardik Latest News : भारतीय क्रिकेट संघातील स्टार ऑलराउंडर खेळाडू हार्दिक पांड्या गेल्या काही दिवसांपासून आपल्या खासगी आयुष्यामध्ये चर्चेत आहे. हार्दिक पांड्या आणि अभिनेत्री, मॉडेल नताशा स्टेनकोविक यांचा घटस्फोट होणार असल्याच्या बातम्यांनी सोशल मीडियावर जोर पकडला होता. अशातच अभिनेत्री नताशाने आपल्या सोशल मीडियावर असे काही फोटो शेअर केले होते ज्यामुळे घटस्फोटाच्या अफवा अधिक हवा मिळाली. पण आता नताशाने चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. यावरुन असा अंदाज लावला जात आहे की, हार्दिक आणि नाताशामधील वाद मिटला आहे.

हार्दिक आणि नताशाच्या घटस्फोटाच्या बातम्या
गेल्या काही दिवसांपूर्वी नताशा स्टेनकोविकने आपल्या सोशल मीडियातील प्लॅटफॉर्मवरील हार्दिकसोबतचे लग्नाचे फोटो हटवले होते. याशिवाय नताशा आयपीएलवेळी हार्दिकला सपोर्ट करण्यासाठी क्रिकेटच्या मैदानात दिसली नाही. अशातच दोघांमध्ये वाद सुरु असल्याच्या अफवा पसरण्यास सुरुवात झाली.

मीडियामध्ये अशी बातमी आली की, दोघांचा घटस्फोट झाल्यास हार्दिकला आपल्या नेटवर्थमधील 70 टक्के हिस्सा नताशाला द्यावा लागेल. पण कपलने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. दुसऱ्या बाजूला दोघांना सोशल मीडियात ट्रोलही करण्यात आले.

लग्नाचे फोटो नताशाने केले रिस्टोअर
घटस्फोटाच्या अफवाच्या बातम्यांना पूर्णविराम दिले आहे. याआधी नताशाने कोणाचेही नाव न घेता इंस्टाग्रामवर लिहिले होते की, आता कोणतरी रस्त्यावर येणार आहे. या मेसेजला बहुतांशजणांनी हार्दिक पांड्याशी जोडले. पण अद्याप हार्दिकने आपल्या रिलेशनशिपवर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. सध्या हार्दिक पांड्या टी20 वर्ल्ड कपसाठी तयारी करत असल्यासंदर्भात काही फोटो शेअर करतोय.

View post on Instagram
 

हार्दिक पांड्याची टी20 साठी निवड
हार्दिक पांड्या सध्या अमेरिका आणि वेस्टइंडिजमध्ये आयोजित करण्यात आलेल्या टी20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. पांड्याची आयपीएलमधील खेळी फारशी दमदार नव्हती. पण आयसीसी टूर्नामेंटमध्ये उत्तर कामगारी करणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

आणखी वाचा : 

सुशांत सिंह राजपूतच्या फ्लॅटमध्ये शिफ्ट झाली अदा शर्मा, म्हणाली...

सारा-रिद्धिमा की शुभमन? सर्वाधिक कमाई आणि नेटवर्थ कोणाचे वाचा