सुशांत सिंह राजपूतच्या फ्लॅटमध्ये शिफ्ट झाली अदा शर्मा, म्हणाली...

| Published : Jun 03 2024, 07:43 AM IST / Updated: Jun 03 2024, 07:46 AM IST

Adah Sharma moves into Sushant Singh Rajput’s apartment

सार

बॉलिवूडमधील दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मुंबईतील अपार्टमेंटमध्ये अभिनेत्री अदा शर्मा शिफ्ट होणार असल्याच्या बातम्यांनी जोर पकडला होता. अशातच अदा शर्मा सुशांतचा फ्लॅट राहण्यासाठी पाच वर्षांनी भाड्याने घेतला आहे.

Entertainment : 'बस्तर द नक्सल स्टोरी' मधील अभिनेत्री अदा शर्मा केवळ आपल्या सौंदर्यामुळेच नव्हे तर आपल्या धमाकेदार अभिनयामुळेही ओखळली जाते. अदा सिनेमांव्यतिरिक्त तिच्या खासगी आयुष्यामुळेही नेहमीच चर्चेत असते. गेल्या काही काळाआधी अदा शर्मा बॉलिवूडमधील दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मुंबईतील फ्लॅटमध्ये शिफ्ट होणार असल्याची चर्चा होती. अशातच अखेर अभिनेत्री अदा शर्मा सुशांतच्या घरी शिफ्ट झाली आहे. याची माहिती खुद्द अदाने दिली आहे.

अदा शर्मा सुशांतच्या घरात शिफ्ट
वर्ष 2020 मध्ये सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर त्याचे वांद्रे येथील फ्लॅट रिकामे होते. याच फ्लॅटमध्ये अदा शर्मा शिफ्ट झाली आहे. बॉम्बे टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीत अदा शर्माने म्हटले की, "ऑक्टोंबर 2020 मध्ये फ्लॅट भाड्याने घेण्यासाठी एग्रीमेंट केले होते. मी चार महिन्यांआधीच आई आणि आजीसोबत मोंट ब्लाँक अपार्टमेंटमध्ये शिफ्ट झाली होती. पण बस्तर आणि द केरळ स्टोरी सिनेमांच्या ओटीटी रिलिजसह काही प्रोजेक्ट्च्या प्रमोशनमध्ये व्यस्त होती. दरम्यान, सर्व गोष्टींमधून थोडासा वेळ मिळाल्याने अखेर सुशांतच्या फ्लॅटमध्ये शिफ्ट झाली आहे."

फ्लॅटमध्ये प्रवेश केल्यानंतर सकारात्मक वाटते
अदा शर्माने पुढे म्हटले की, "काहीजणांनी मला सुशांतच्या फ्लॅटमध्ये राहण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला होता. पण सुशांतच्या फ्लॅटमध्ये शिफ्ट झालीय. संपूर्ण आयुष्या वांद्रे येथील पाली हिलमधील एका घरात घालवले आहे. आता सुशांतच्या घरात सकारात्मक उर्जा असल्याचे जाणवते. केरळ आणि मुंबईतील माझे घर झाडाझुडपांनी आणि पक्षांनी घेरलेले आहे. यामुळेच मी अशा घराच्या शोधात होते जेथून निसर्ग आणि पक्षांचा आवाज येत राहिल."

पाच वर्षांसासाठी भाड्याने घेतलेय
अदाने सुशांतचा फ्लॅट पाच वर्षांसाठी भाड्याने घेतल्याचेही सांगितले. अदा म्हणते, मी कधीच कोणाचे ऐकले नाही. माझ्या मनाला जे वाटते तेच केले आणि सुशांतच्या फ्लॅटमध्ये शिफ्ट झाली. ऑगस्ट, 2023 मध्ये बातमी आली होती की, अदा मोंट ब्लाँक अपार्टमेंटमधील फ्लॅट खरेदी करणार आहे. रिपोर्ट्सनुसार, सुशांतने कथित रुपात डिसेंबर, 2019 मध्ये 4.5 लाख प्रति महिन्याच्या हिशोबाने अपार्टमेंट भाड्याने घेतले होते. हा एक डुप्लेक्स फ्लॅट आहे. यामध्ये खाली मोठा हॉल आणि वरच्या मजल्यावर तीन बेडरुम आहेत.

आणखी वाचा :

'मानव शिवाय अर्चना काहीच नाही' म्हणत... अंकिता लोखंडेने शेअर केली भावनिक पोस्ट

OTT Release : विकेंडला मनोरंजनाचा डबल धमाका, पाहा हे सिनेमे-वेब सीरिज