Mirzapur 3 Review : थ्रिलर आणि गुढ गोष्टींनी भरलाय सीझन-3, कोण ठरणार मिर्झापुरच्या गदीचा खरा बाहुबली? वाचा सविस्तर

| Published : Jul 05 2024, 09:35 AM IST

Mirzapur 3

सार

Mirzapur 3 Review : अली फजल आणि पंकज त्रिपाठी यांची बहुप्रतिक्षित वेब सीरिज मिर्झापूर अखेर 5 जुलैला ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आली आहे. अशातच वाचा वेब सीरिजचा संपूर्ण रिव्हू सविस्तर...

Mirzapur 3 Review : मिर्झापूरचा तिसरा सीझन अखेर प्रेक्षकांसाठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला आहे. या सीझनची सुरुवात दुसऱ्या सीझनच्या अखेरच्या भागापासून झाल्याचे दाखवण्यात आले आहे. मिर्झापूरच्या-2 सीझनच्या शेवटच्या भागात सत्तेसाठी नेहमीच धडपड करणाऱ्या मुन्ना त्रिपाठी (दिव्येंदु) याचा मृत्यू आणि मिर्झापूरमधील सर्वाधिक मोठा माफिया असणाऱ्या कालीन भैय्याची (पंकज त्रिपाठी) गुड्डू पंडित (अली फजल) आणि गोलू (श्वेता त्रिपाठी) यांच्यासोबत हाणामारी होताना दाखवले होते. यानंतर गुड्डू मिर्झापूरचा बादशहा बनला होता. तर वाचा तिसऱ्या सीझनचा संपूर्ण रिव्हू....

मिर्झापूर-3 ची कथा
मिर्झापूरच्या तिसऱ्या सीझनमध्ये मुन्ना भैय्याचा मृत्यू झाल्याचे दाखवण्यात आले आहे. अशातच गुड्डू पंडित मिर्झापूरवर अधिराज्य करताना दिसतोय. या सर्व गोष्टींनंतर गुड्डूला पूर्वांचलवरही आपले वर्चस्व वाढवायचे आहे. सीरिजमध्ये जौनपुरचा शरद शुक्ला (पश्चिमेकडील बाहुबली) याची एण्ट्री होताना दाखवण्यात आले आहे. सीरिजमधील सुरुवातीच्या काही एपिसोडमध्ये थेट लढाई मिर्झापूरच्या गादीसाठी शरद शुक्ला आणि गुड्डू पंडितमध्ये होताना पाहायला मिळणार आहे.

दुसऱ्या बाजूला उत्तर प्रदेशची मुख्यमंत्री झालेली माधुरी यादवला बाहुबलींचा खात्मा करण्याचा प्लॅन करते. याशिवाय सीरिजमध्ये कालीन भैय्या चौथ्या एपिसोडनंतर दिसणार आहे. खरंतर, सीरिजमधील कालीन भैय्याची भूमिका धमाकेदार असल्याचे बोलले जात आहे. अशातच मिर्झापूरच्या गादीवर नक्की कोणाचा हक्क टिकून राहणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

स्टारकास्टच्या भूमिकेबद्दल थोडक्यात…
मिर्झापूरच्या तिसऱ्या सीझनध्ये गुड्डू पंडित म्हणजेच अली फजलने आपल्या भूमिकेला न्याय देण्याचा पुरेपुर प्रयत्न केला आहे. श्वेता त्रिपाठी म्हणजेच गोलू तिसऱ्या सीझनमध्ये लेडी डॉन झाल्याचे दाखवण्यात आले आहे. याशिवाय शरद शुक्ला (अंजुम शर्मा) याने देखील सीरिजमध्ये आपली छाप पाडली आहे. एवढेच नव्हे पंकज त्रिपाठी संपूर्ण सीरिजच्या तुलनेत फार कमी दिसलेत. पण प्रेक्षकांची मन कालीन भैय्यांनी जिंकली आहेत. सीरिजमधील विजय वर्माची भूमिकाही आपल्यासोबत अनेक रहस्य घेऊन येताना दाखवण्यात आले आहे.

आणखी वाचा :

Mirzapur-3 साठी या कलाकांरानी वसूल केलीय सर्वाधिक फी, ऐकून व्हाल हैराण

Mirzapur 3 ची रिलीज डेट ते थ्रिलरपर्यंतच्या 6 खास गोष्टी, घ्या जाणून