Mirzapur-3 साठी या कलाकांरानी वसूल केलीय सर्वाधिक फी, ऐकून व्हाल हैराण
Entertainment Jul 04 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:social media
Marathi
मिर्झापूरच्या तिसऱ्या सीझनची उत्सुकता
बहुप्रतिक्षित मिर्झापूरचा तिसरा सीझन पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. 5 जुलैपासून ओटीटी प्लॅटफॉर्मवर क्राइम-थ्रिलर सीरिज पाहण्याचा आनंद लुटता येणार आहे.
Image credits: instagram
Marathi
मिर्झापूरच्या सीरिजमध्ये ट्विस्ट
मिर्झापूर-3 मध्ये दिव्येंदु शर्माची एक्झिट झाली आहे. खरंतर, कथेत ट्विस्ट असून यंदाच्या सीरिजमध्ये धमाका होणार आहे. अशातच जाणून घेऊया सीरिजमधील कलाकारांच्या फी बद्दल सविस्तर...
Image credits: instagram
Marathi
रसिका दुग्गल
रिपोर्ट्सनुसार, मिर्झापुरमधील बीना त्रिपाठीची भूमिका साकारणाऱ्या रसिका दुग्गलने सीरिजच्या प्रत्येक एपिसोडसाठी 2 लाख रुपये घेतले आहेत.
Image credits: Twitter
Marathi
पंकज त्रिपाठी
पंकज त्रिपाठी सीरिजमधील जेष्ठ कलाकार आहे. रिपोर्ट्सनुसार, पंकज त्रिपाठींनी दुसऱ्या सीझनसाठी 10 कोटी रुपये फी घेतली होती. यंदाच्या वेळी पंकज त्यापेक्षाही अधिक फी घेऊ शकतात.
Image credits: Twitter
Marathi
अली फजल
रिपोर्ट्सनुसार, अली फजलला प्रत्येक एपिसोडसाठी जवळजवळ 12 लाख रुपये मिळाले आहेत.
Image credits: instagram
Marathi
जितेंद्र कुमार
पंचायमधील सरपंच जी भूमिका साकारलेल्या जितेंद्र कुमारची मिर्झापूरच्या तिसऱ्या सीझनमध्ये एण्ट्री झाली आहे. जितेंद्र प्रति एपिसोडसाठी 2-4 लाख रुपये फी घेतो असे काही रिपोर्ट्स सांगतात.
Image credits: Twitter
Marathi
श्वेता त्रिपाठी
गोलूची भूमिका साकारलेली श्वेता त्रिपाठी प्रत्येक एपिसोडसाठी 2.20 लाख रुपये फी घेते.