'पंचायत-3' सीरिजमध्ये दडलंय 'मिर्झापुर' च्या पुढील सीझनची मोठी अपडेट, अली फजल म्हणतो...

| Published : May 31 2024, 11:20 AM IST / Updated: May 31 2024, 03:40 PM IST

Panchayat and mirzapur

सार

‘पंजायत-3’ सीरिज नुकतीच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली. अशातच प्रेक्षकांना मिर्झापुरच्या सीरिजचे वेध लागले आहेत. याच सीरिजबद्दल अली फजलने एक हिंट दिली आहे.

Mirzapur-3 Big Update : प्रेक्षकांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर पंचायत-3 सीरिज प्रदर्शित करण्यात आली आहे. अशातच दुसऱ्या बाजूला मिर्झापुरचा पहिला आणि दुसरा सीझन आल्यानंतर प्रेक्षकांमध्ये तिसऱ्या सीझनची फार उत्सुकता दिसून येत आहे. याच दरम्यान, अभिनेता अली फजलने मिर्झापुरच्या तिसऱ्या सीझनची हिंट दिली आहे. खरंतर, पंचायत-3 मध्ये मिर्जापूरच्या पुढील सीझनचे मोठे अपडेट असल्याचे बोलले जात आहे.

अली फजलने मिर्झापुरच्या तिसऱ्या सीझनची दिली हिंट
एका चाहत्याने अली फजलला (Ali Fazal) सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म 'X' वर टॅग करत पंचायत-3 नव्हे मिर्झापुरच्या तिसऱ्या सीझनची वाट पाहतोय असे विचारले. पंचायत सीरिज नाही पाहिली तर चालेल का? मी मिर्झापूरच्या सीरिजची वाट पाहतोय. यावरच अली फजलने उत्तर देत म्हटले की, पंचायत पाहा, यामध्येच मिर्झापुरच्या सीझन-3 ची एक मोठी हिंट दडलीय."

मिर्झापुरच्या नव्या सीझनचे अपडेट
मिर्झापुरच्या तिसऱ्या सीझनचे काही फुटेज अ‍ॅमेझॉन प्राइमवर झळकवण्यात आले होते. व्हिडीओमध्ये पंकज त्रिपाठी म्हणजेच कालीन भैय्या विचारतायत की, विसरलात तर नाही ना? यामध्ये अली फजल, रसिका दुग्गल, विजय शर्मा, श्वेता त्रिपाठी आणि ईशा तलवारसह काहीजण सीरिजमध्ये दिसून येणार आहे. मिर्झापूरचा पहिला प्रीमियर वर्ष 2018 मध्ये झाला होता. यानंतर वर्ष 2020 मध्ये दुसरा सीझन आणि आता तिसऱ्या सीझनवर काम सुरू आहे.

पंचायत-3 सीझनची कथा
पंचायतमध्ये एका इंजिनिअर पदवीधर व्यक्तीची कथा आहे. त्याला गावात पंचायतच्या सचिवाची नोकरी मिळाली आहे. सीरिजचा तिसरा सीझन 28 मे ला प्रदर्शित करण्यात आला होता. यामध्ये नीना गुप्ता, रघुबीर यादव, जितेंद्र कुमार, चंदन रॉय सारखे कलाकार दिसून येणार आहेत.

आणखी वाचा : 

अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग पार्टीची धूम, पहिला Video आला समोर

'एकतर आयुष्यातील महत्वाच्या व्यक्तींना किंवा पैशांना गमावता', हृतिक रोशनने धूम्रपान करणाऱ्यांना दिलाय हा महत्त्वाचा संदेश