'एकतर आयुष्यातील महत्वाच्या व्यक्तींना किंवा पैशांना गमावता', हृतिक रोशनने धूम्रपान करणाऱ्यांना दिलाय हा महत्त्वाचा संदेश

| Published : May 31 2024, 08:31 AM IST / Updated: May 31 2024, 01:00 PM IST

hrithik roshan war 2
'एकतर आयुष्यातील महत्वाच्या व्यक्तींना किंवा पैशांना गमावता', हृतिक रोशनने धूम्रपान करणाऱ्यांना दिलाय हा महत्त्वाचा संदेश
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

प्रत्येक वर्षी  31 मे ला देशभरात ‘जागतिक तंबाखू विरोधी दिन’ साजरा केला जातोय. यासंदर्भात प्रत्येक वर्षी वेगवेगळे आरोग्य शिबीरे, हेल्थ चेकअपच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. पण अभिनेता हृतिक रोशनने धूम्रपान करणाऱ्यांना एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे.

World No Tobacco Day 2024 : ‘स्मोकिंग किल्स’ किंवा ‘सिगरेट पिणे आरोग्यासाठी धोकादायक असते’ असे आपण नेहमीच वाचतो अथवा पाहतो. खरंतर, धूम्रपान करणे आरोग्यासाठी सर्वाधिक घातक गोष्ट असून यामध्ये तुम्हाला गंभीर आजार होण्याची शक्यता आहे. काहीवेळेस सातत्याने धूम्रपान केल्याने व्यक्तीच्या जीव देखील जाऊ शकते. जगभरातील अनेक रिसर्चमध्ये धूम्रपान केल्याने आरोग्यावर कोणते परिणाम होतात याबद्दल धक्कादायक रिपोर्ट्स समोर आले आहेत. तरीही धूम्रपान करणाऱ्यांची संख्या कमी होत नाहीये.

याशिवाय सिनेमा पाहण्यासाठी जातो तेव्हा देखील त्याच्या सुरुवातीला मुकेश नावाच्या व्यक्तीला धूम्रपान केल्याने कोणती गंभीर समस्या निर्माण झाली होती याबद्दल दाखवत जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जातो. पण तरीही धुम्रपान करणे थांबले जात नाही. अशातच बॉलिवूडमधील अभिनेता हृतिक रोशनने (Hrithik Roshan) धूम्रपान करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा सल्ला दिलाय.

हृतिकने कशी सोडली सिगरेची सवय?
काही वर्षांपूर्वी हृतिक रोशनने एका मुलाखतीत सिगरेटची सवय सोडवण्यावर भाष्य केले होते. अभिनेत्याने म्हटले होते की, मी देखील धूम्रपान करायचो. एका दिवसात 3 पॅकेट सिगरेट ओढायचो. पण एक काळ असा आला मला वाटले सिगरेट पिणे सोडले पाहिजे आणि तसेच केले.

सिगरेट सोडल्याने आरोग्यामध्ये दिसले बदल
हृतिकने पुढे म्हटले की, सिगरेट पिणे बंद केल्याच्या दीड आठवड्यानंतर शरिरात सकारात्मक परिणाम दिसू लागले होते. आरोग्य अधिक उत्तम होण्यासह त्वचेतही फार बदल झालेला दिसून आला. आयुष्यात सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे आरोग्य. खरंतर, आरोग्य उत्तम असल्यास तुम्ही सर्व गोष्टींचा आनंद घेऊ शकता. आयुष्यात व्यक्तीने अशा काही गोष्टींवर विचार केला पाहिजे ज्या आपल्यासाठी चांगल्या आणि वाईट आहेत.

सिगरेट कॅन्सर नव्हे अन्य गंभीर आजारांना देते निमंत्रण
रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्र (Centers for Disease Control and Prevention) यांच्यानुसार, धूम्रपान केल्याने त्यामध्ये असलेल्या निकोटीनच्या कारणास्तव मेंदूला आपल्याला रिलॅक्स वाटतेय अशी भावना वाटते ती पूर्णपणे संपते. यामुळे चिडचिडेपणा आणि काम न करण्याचे मन होते. याच कारणास्तव सातत्याने सिगरेट ओढण्याचे मन करते. यामुळे स्वत:ला सिगरेटपासून दूर राहण्यासाठी मोटिव्हेट करणे फार महत्त्वाचे असते.

धूम्रपान न करण्याचे फायदे
अमेरिकेतील शासकीय वेबसाइट NIH वर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, धूम्रपान करणे बंद केल्याने ब्लड प्रेशर सामान्य होते. रक्तातील कार्बन मोनो ऑक्साइड कमी होण्यास मदत होते. यामुळे रक्तात ऑक्सिजनचा सुरळीत पुरवठा होऊ शकतो. खोकला आणि हृदयासंबंधित आजारांचा धोका कमी होतो.

हृतिक म्हणतो की, एक गोष्ट नेहमीच लक्षात ठेवा, "सिगरेट केवळ जाळते. तुम्हाला, तुमच्या शरिराला, तुमच्या जवळ असणाऱ्या व्यक्तीला आणि पैशांसह परिवाराला." सिगरेटची किंमत 10-20 रुपये असली तरीही यामुळे आरोग्यासंबंधित काही गंभीर आजार उद्भवतात. यासाठी केल्या जाणाऱ्या उपचारांचा खर्च देखील लाखो रुपये येतो. यामुळे धूम्रपान करत असाल तर स्वत:लाच वचन द्या आजपासून सिगरेट पिणे बंद करेन.

आणखी वाचा : 

World No Tobacco Day 2024 : "मुलांना तंबाखू उद्योगापासून लांब ठेवणे" यंदाचे डब्लूएचओचे जागतिक तंबाखू विरोधी दिनीचे उद्दिष्ट

व्यायाम आणि डाएट करुनही पोटावरील चरबी कमी होत नाही? लाइफस्टाइलमध्ये करा हे 5 बदल