सार
Vijay Kadam Passes Away : मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते विजय कदम यांचे वयाच्या 67 व्या वर्षी निधन झाले आहे. गेल्या काही काळापासून विजय कदम कॅन्सरचा लढा देत होते. अखेर 10 ऑगस्टला जेष्ठ अभिनेते यांनी वयाच्या 67 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे.
Vijay Kadam Passes Away : मराठी सिनेसृष्टीतून अत्यंत दु:खद बातमी समोर येत आहे. जेष्ठ अभिनेते विजय कदम यांचे वयाच्या 67 व्या वर्षी निधन झाले आहे. विजय कदम गेल्या काही काळापासून कॅन्सरचा लढा देत होते. अखेर आज (10 ऑगस्ट) विजय कदम यांची प्राणज्योत मालवली आहे. यामुळे मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. विजय कदम यांनी वर्ष 1980 आणि 90 च्या दशकाच्या सुरुवातील आपल्या अभिनयातून प्रेक्षकांवर छाप पाडली होती. आपल्या बहुआयामी कलागुणांमुळे विजय कदम यांना ओखळले जायचे.
कॅन्सरविरोधाक लढा देत होते विजय कदम
जेष्ठ अभिनेते विजय कदम गेल्या दीड वर्षांपासून कॅन्सरशी झुंज देत होते. त्यांच्यावर मुंबईतील अंधेरीमधील एका रुग्णालयात उपचारही सुरु होते. आज सकाळी विजय कदम यांचे निधन झाले आहे. विजय कदम यांच्या पश्चात बायको आणि मुलगा आहे. विजय कदम यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. विजय कदम यांच्या निधनामुळे अनेक मराठी कलाकारांनी दु:ख व्यक्त केले आहे.
विजय कदम यांचे करियर
विजय कदम यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात नाटकांपासून केली होती. यानंतर विजय कदम यांनी काही मराठी सिनेमांमध्ये काम केले. एवढेच नव्हे मालिकांमधूनही विजय कदम यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. विजय कदम यांचे 'विच्छा माझी पुरी करा' नाटक रंगभूमीवर गाजले होते.
विजय कदम यांचे सिनेमे
विजय कदम यांनी 1980 च्या दशकात आपल्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. ‘चश्में बहाद्दर’, ‘हळद रुसली कुंकू हसले’ , ‘आम्ही दोघे राजा राणी’ अशा काही सिनेमांतून विजय कदम यांना अधिक प्रसिद्धी मिळाली. आता विजय कदम यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीतील एक बहुआयामी अभिनेता गमावल्याने प्रत्येकजण दु:ख व्यक्त करत आहे. सोशल मीडियावरही विजय कदम यांच्या चाहत्यांकडून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.
आणखी वाचा :
सुप्रीम कोर्टात दाखवला जाणार 'लापता लेडीज', आमिरसह सरन्यायाशीशही पाहणार सिनेमा
अभिनेत्री Prajakta Mali च्या मराठी सिनेमातील 5 गाजलेल्या भूमिका