सार

Laapataa Ladies Movie Screening : आमिर खान निर्मित सिनेमा 'लापता लेडीज' आज सुप्रीम कोर्टात दाखवला जाणार आहे. यावेळी अभिनेत्यासह काही न्यायाशीधांच्या परिवारासह सिनेमा पाहिला जाणार आहे.

Supreme Court Foundation Day : बॉलिवूडमधील ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेला सिनेमा 'लापता लेडीज' (Laapataa Ladies Movie) आज (9 ऑगस्ट) सुप्रीम कोर्टात दाखवला जाणार आहे. यावेळी सुप्रीम कोर्टातील काही न्यायाधीश, त्यांच्या परिवारातील मंडळी आणि अन्य अधिकारीही सिनेमा पाहण्यासाठी उपस्थितीत राहणार आहेत. समान लैंगिकतेच्या मुद्द्यावर तयार करण्यात आलेल्या सिनेमाला प्रेक्षकांनी पसंती दर्शवली होती. आता सुप्रीम कोर्टात सिनेमा प्रदर्शित करताना अभिनेता आमिर खान (Amir Khan) आणि दिग्दर्शिका किरण रावही (Kiran Rao) उपस्थितीत राहणार आहेत.

सुप्रीम कोर्टाला 75 वर्षे पूर्ण
9 ऑगस्टला सुप्रीम कोर्टाला 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. याच स्थापनेच्या दिवशी काही कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. तेव्हाच आमिर खानचा लापता लेडीज सिनेमा दाखवला जाणार आहे. कोर्टाच्या प्रशासकीय भवन परिसराच्या सभागृहात सिनेमा दाखवला जाणार आहे.

सरन्यायाधीशही उपस्थितीत राहणार
सुप्रीम कोर्टाच्या कार्यक्रमावेळी भारताचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड (CJI D.Y. Chandrachud) सिनेमाच्या स्क्रिनिंगवेळी उपस्थितीत राहणार आहेत. याशिवाय कोर्टातील काही न्यायाशीध आपल्या परिवारासोबत सिनेमा पाहण्यासाठी उपस्थिती लावणार आहेत. सिनेमा संध्याकाळी 4 वाजून 15 मिनिटांनी दाखवला जाणार आहे. सिनेमातील प्रत्येक कलाकाराच्या भूमिकेबद्दलही प्रेक्षकांनी कौतूक करण्यात आले होते.

लापता लेडीजची अनोखी कथा
लापता लेडीच सिनेमाची अनोखी कथा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. देशात शिक्षणाचा प्रचार केल्यानंतरही महिलांना पुरुष प्रधान देशात आपल्या मर्जीने आयुष्य जगण्याचा हक्क कशाप्रकारे मिळते हे दाखवण्यात आले आहे. सिनेमात खासदार आणि अभिनेता रवि किशन यांनी पोलीसाची भूमिका साकारली आहे.

आणखी वाचा : 

Independence Day 2024 : मनामनातील देशभक्ती जागवणारे सिनेमातील 10 दमदार डायलॉग्स

Bigg Boss 18 च्या घरात बॉलिवूडमधील 3 मोठे कलाकार झळकण्याची शक्यता