Marathi

अभिनेत्री Prajakta Mali च्या मराठी सिनेमातील 5 गाजलेल्या भूमिका

Marathi

प्राजक्ता माळीचा वाढदिवस

प्राजक्ता माळीचा 8 ऑगस्टला वाढदिवस असतो. मूळच्या पुण्यातील प्राजक्ताने मराठी सिनेसृष्टीवर आपल्या दमदार अभिनयाने छाप पाडली आहे.

Image credits: Instagram
Marathi

प्राजक्ता माळीच्या भूमिका

प्राजक्ता माळीने मालिकांसह मराठी चित्रपट आणि काही वेब सीरिजमध्येही काम केले आहे. जाणून घेऊया अभिनेत्रीच्या सिनेमात गाजलेल्या काही भूमिकांबद्दल अधिक.

Image credits: Instagram
Marathi

खो-खो सिनेमा (2013)

वर्ष 2013 मध्ये आलेल्या खो-खो सिनेमात प्राजक्ता माळीने सुमनची भूमिका साकारली होती. या सिनेमात सिद्धार्थ जाधव, भरत जाधव, क्रांती रेडकर मुख्य भूमिकेत झळकले होते. 

Image credits: Instagram
Marathi

संघर्ष सिनेमा (2014)

संघर्ष सिनेमात प्राजक्ता माळीने तडफदार भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली होती. सिनेमात प्राजक्तासह पंकज खामकर, अंशूमन विचारे, राजेश श्रृंगारपुरे असे कलाकार झळकले होते.

Image credits: Facebook
Marathi

हंपी (2017)

वर्ष 2017 मध्ये ललित प्रभाकरसोबत हंपी सिनेमातून प्राजक्ता माळी झळकली होती. यामध्ये सोनाली कुलकर्णी, प्रियदर्शनी जाधव आणि छाया कदमसारखे दमदार कलाकार झळकले होते.

Image credits: Facebook
Marathi

आणि...डॉ. काशिनाथ घाणेकर (2018)

डॉ. काशिनाथ घाणेकरमध्ये प्राजक्ता माळीने आशा काळे नावाची भूमिका साकारली होती. यामध्ये सुबोध भावे, सुमित राघवन यांच्यासह अन्य कलाकारांनी धमाकेदार भूमिका सिनेमात केल्या होत्या.

Image credits: Instagram
Marathi

डोक्याला शॉट (2019)

कॉम्प्लिकेडेट लग्नाची कथा मांडणारा डोक्याला शॉट सिनेमात प्राजक्ताने सुब्बुलक्ष्मीची भूमिका साकारली होती. सिनेमात प्राजक्तासोबत सुव्रत जोशी देखील मुख्य भूमिकेत झळकला होता.

Image credits: Instagram

440Cr चा मालक असणाऱ्या Jr NTR ची कमाई ऐकून बसेल धक्का

AMKDT सिनेमासाठी तब्बूपेक्षा अजयला मिळाली 733 टक्के अधिक रक्कम

बॉलिवूडचा अभिनेता Bangladesh च्या केवळ 6 सिनेमांमुळे बनला स्टार

2024 मधील TOP 10 सिनेमे, या 3 Movies चे 100CR च्या पार कलेक्शन