महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम गौरव मोरे याने त्याच्या लग्नाबद्दल मोठी घोषणा केली आहे. खरंतर, गौरव म्हणतो लग्न लवकरच होईल पण तारीख नक्की नाही. यामुळे त्याच्या चाहत्यांना गौरवच्या लग्नाची उत्सुकता लागली आहे.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय विनोदी कार्यक्रमामुळे घराघरात पोहोचलेला अभिनेता गौरव मोरे याने नुकतीच आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत मोठी कबुली दिली आहे. सध्या तो हास्यजत्रेमध्ये दिसत नसला, तरी चाहत्यांमध्ये त्याच्याबाबत उत्सुकता कायम आहे. विशेषतः, त्याच्या लग्नाविषयी चर्चा रंगली असताना गौरवने स्वतःच पुढे येऊन खुलासा केला आहे.
एका मुलाखतीदरम्यान गौरव मोरे याला त्याच्या लग्नाबाबत प्रश्न विचारण्यात आला. हास्यजत्रेतील एका स्किटमध्ये त्याचे लग्न होण्याआधीच अडते, याचा संदर्भ देत त्याला विचारण्यात आलं की, खऱ्या आयुष्यात काय विचार आहे? त्यावर गौरव हसून म्हणाला, “शनिवारी सांगतो!” मात्र, पुढे त्याने स्पष्ट केलं की, “होईल कधी ना कधी. सांगेन मी नक्की! यावर्षी नाही पण पुढच्या वर्षी करेन. तारीख ठरली नाही, महिना ठरला नाही, पण होईल!”
हास्यजत्रेमधून अचानक एक्झिट घेतलेल्या गौरव मोरेबाबत एक प्रश्न कायम उपस्थित होता. तो या कार्यक्रमात पुन्हा दिसणार का? यावर उत्तर देताना गौरवने सांगितलं, “तशी शक्यता सध्या कमी आहे. मला वेब सिरीज करायची आहे आणि त्यासाठी मी सध्या शोधमोहीम सुरू केली आहे. त्यामुळे माझं लक्ष त्या दिशेने आहे.”
गौरव मोरेच्या वर्क फ्रंटबद्दल सांगायचं झाल्यास, तो नुकताच ‘जयभीम पँथर-एक संघर्ष’ या चित्रपटात झळकला होता. हा सिनेमा ११ एप्रिल २०२५ रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटात गौरवसोबत मिलिंद शिंदे, शशांक शेंडे, जयवंत वाडकर, अभिजीत चव्हाण, संजय कुलकर्णी, चिन्मय उदगीरकर यांसारखे दिग्गज कलाकारही झळकले होते.सध्या गौरव मोरेचं करिअर वेगळ्या वळणावर असून चाहत्यांना त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सची उत्सुकता लागून राहिली आहे. त्याचबरोबर, त्याच्या लग्नाची अधिकृत घोषणा कधी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
(राहा अपडेट, राहा जगाच्या पुढे. सातत्याने अपडेट होणाऱ्या आमच्या फेसबुक आणि एक्स (ट्विटर) पेजला सबक्राईब करुन ताज्या घडामोडी जाणून घ्या.)
आमच्या एशियानेट न्यूज मराठीच्या फेसबुक पेजला सबस्क्राईब करा. त्यासाठी येथे क्लिक करा.
आमच्या एशियानेट न्यूज मराठीच्या एक्स (ट्विटर) पेजला सबस्क्राईब करा. त्यासाठी येथे क्लिक करा.


