Panchayat 4 Review : अमेझॉन प्राइम व्हिडिओवरील बहुप्रतीक्षित पंचायत वेब सीरिजचा अखेर चौथा सीझन लाँच करण्यात आला आहे. यंदाच्या सीझनमध्ये नवे ट्विस्ट, निवडणूक, गावातील गदारोळ आणि महिला राज अशा काही गोष्टी पहायला मिळणार आहेत. 

Panchayat Season 4 Review : लोकप्रिय वेब सीरिज पंचायतचा चौथा सीजन अमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलर आल्यापासूनच लोक याची आतुरतेने वाट पाहत होते. सीरिज पाहण्यापूर्वी हा रिव्यू वाचा.

पंचायत सीजन ४ ची कथा काय आहे?

पंचायत सीजन ४ मध्ये फुलेरा गावातील वातावरण आधीपेक्षा जास्त तापलेले दिसते. सचिवजी आणि बनराकसवर गुन्हा दाखल झाल्याने कथा गंभीर वळण घेते. सचिवजींना त्यांच्या भविष्याची आणि करिअरची काळजी वाटते, तर बनराकसला निवडणूक लढवण्यात अडचणी येतील याची चिंता आहे. प्रधानजींवर गोळी कोणे चालवली याचाही खुलासा होईल.

क्रांति देवी आणि मंजू देवी यांच्यात सरपंचपदाची चुरशीची लढत होईल. क्रांति देवींसोबत बनराकस, बिनोद, अशोक आणि आमदारांचा पाठिंबा आहे, तर मंजू देवींना प्रधानजी आणि सचिवजींचा विश्वास आहे. निकाल काय लागेल हे सीरिज पाहिल्यावरच कळेल, पण हा सीजन ड्रामा आणि ट्विस्टने भरलेला आहे हे नक्की.

पंचायत सीजन ४ च्या कलाकारांचा अभिनय कसा आहे?

पंचायत सीजन ४ मध्ये जितेंद्र कुमार, नीना गुप्ता, रघुबीर यादव, फैसल मलिक, चंदन रॉय, सान्विका, दुर्गेश कुमार, सुनीता राजवार आणि पंकज झा मुख्य भूमिकेत आहेत. सर्वांनीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. स्टारकास्टमुळेच ही सीरिज अधिक लोकप्रिय होत आहे. पंचायत ४ मनोरंजक आहे, पण इतर सीजनच्या तुलनेत थोडा कमी मजेशीर आहे. यामुळे आम्ही याला ५ पैकी ३.५ स्टार देऊ.