- Home
- Entertainment
- Fans Angry On Riteish Deshmukh : रितेश जेनेलियाचे सितारे जमीन पर, हाऊसफुल 5 चित्रपट ठरले हिट, पण एका फॅनसोबत चुकिचा वागल्याने रितेश होतोय ट्रोल
Fans Angry On Riteish Deshmukh : रितेश जेनेलियाचे सितारे जमीन पर, हाऊसफुल 5 चित्रपट ठरले हिट, पण एका फॅनसोबत चुकिचा वागल्याने रितेश होतोय ट्रोल
हाउसफुल ५ आणि सितारे जमीन पर या चित्रपटांच्या यशानंतर रितेश देशमुखचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यात तो एका फॅनला झिडकारताना दिसतोय. फॅन सेल्फी घेण्याचा प्रयत्न करतो, पण तो त्याचा हात बाजूला करतो.

रितेश आणि जेनेलिया बॉलीवूडचे आवडते कपल आहे. त्यांची लव्हस्टोरी, बॉन्डिंग रील्समध्येही दिसते. दोही डाउन-टू-अर्थ आणि सर्वांशी विनम्रपणे वागतात. आतापर्यंत त्यांची चाहत्यांनी कधीही तक्रार केलेली नाही. उलट रितेशचे कौतुकच केले आहे. तो चाहत्यांना खून सहकार्य करतो.
रितेशची हाउसफुल ५ आणि जेनेलियाची 'सितारे जमीन पर' हे चित्रपट हिट ठरले आहेत. त्यामुळे या कपलची डिमांड पुन्हा वाढली आहे. दोघांना बॉलिवूडमधून चांगल्या ऑफर येत आहेत.
'सितारे ज़मीन पर'च्या प्रीमियरमध्ये रितेश जेनेलियाचा हात धरून फॅन्समधून स्क्रीनिंग हॉलमध्ये जात होता. यावेळी दोघेही खून सुंदर दिसत होते. दरम्यान, याच वेळी एक फॅन दोघांच्या समोर आला. तो एक छोटा मुलगा दिसतोय. तो रितेशचा फॅन असल्याचे सांगतो.
दोघांसोबत सेल्फी घेण्यासाठी तो आपला मोबाईल बाहेर काढतो. तो दोघांसोबत आपल्या सेल्फी घेणार तेव्हाच रितेश त्याला दूर सारतो. रितेशने कधीही फॅनसोबत असे केले नाही. पहिल्यांदाच त्याने फॅनला दूर सारले आहे. तसेच तो लहान मुलगा असल्याने नेटिझन्स मुलाच्या बाजूने उभे राहिले आहेत.
रितेशने फॅनला दूर ढकलतानाचा व्हिडिओ व्हायरल.
नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी म्हटले आहे की दोन्हीच्या चित्रपटांच्या यशाचा हा परिणाम आहे.

