सार

Amruta Fadnavis New Song : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आपले नवे गाणे 'सावन' नुकतेच प्रदर्शित केले आहे. हे गाणे प्रेमाच्या भावना व्यक्त करणारे असून त्याला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Amruta Fadnavis New Song Saawan :  महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस सामाजिक कार्यात नेहमीच सक्रिय असल्याचे दिसून येतात. एवढेच नव्हे कोणत्या ना कोणत्या कारणास्तव अमृता फडणवीस चर्चेत राहतात. याशिवाय अमृता यांची  सोशल मीडियावर तगडी फॅन फॉलोइंग आहे. अलीकडल्या काळात अमृता फडणवीस यांनी आपल्या आवाजातील काही गाणी प्रदर्शित केली आहेत. अशातच आता अमृता फडणवीस यांचे आणखी एक नवे गाणे ‘सावन’ नुकतेच प्रदर्शित झाले आहे. 

अमृता फडणवीस यांचे नवे गाणे 
यशस्वी व्यावसायिका ते गायिका असणाऱ्या अमृता फडणवीस यांचे नवे गाणे युट्यूबवर प्रदर्शित करण्यात आले आहे. ‘सावन’ असे गाण्याचे नाव असून मनातील प्रेमाच्या भावना व्यक्त करणारे गाणे आहे. गाण्याचे बोल “इस बार तेरे शहर में जो सावन आया है, उससे मेरी आँखों ने ही बरसना सीखा है”, अशा पद्धतीचे आहेत. या गाण्याला आतापर्यंत 8 लाखांहून अधिक जणांनी पाहिले आहे. तर 26 हजार जणांनी गाण्याला पसंती दर्शवली आहे. हे गाणे अमृता फडवणीस यांच्या युट्यूब चॅनलवरुन रिलीज करण्यात आले आहे. 

YouTube video player

अमृता फडणवीस यांची गाणी 
अमृता फडणवीस यांना गायनाची फार आवड आहे. एखाद्या सोहळ्यातही अमृता फडणवीस अगदी आनंदाने आपल्या आवाजातील गाणे प्रेक्षकांना ऐकून  दाखवतात. आतापर्यंत अमृता फडणवीस यांनी 20 हून अधिक गाण्यांना आपला आवाज दिला आहे. खरंतर, अमृता फडणवीस यांना त्यांच्या गाण्यांवरुन ट्रोल केले जाते. पण तरीही अमृता फडणवीस आपल्याला आवडणारी कला वेळोवेळी जपत असल्याचे दिसून येते. अमृता फडणवीस यांचे याआधी  शिव तांडव स्तोत्र, मोरया रे, ओम गण गणपतेय गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. 

आणखी वाचा : 

सुप्रीम कोर्टात दाखवला जाणार 'लापता लेडीज', आमिरसह सरन्यायाशीशही पाहणार सिनेमा

अभिनेत्री Prajakta Mali च्या मराठी सिनेमातील 5 गाजलेल्या भूमिका