सार

Sonakshi Sinha-Zaheer Iqbal Wedding : अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बालने अखेर 23 जूनला लग्नगाठ बांधली. या कपलच्या लग्नाला सोनाक्षीचे दोन्ही भाऊ नसल्याची चर्चा रंगली होती. यावरच आता सोनाक्षीचा भाऊ कुशने प्रतिक्रिया दिली आहे.

Kush Sinha Reaction on Sonakshi Wedding : सोनाक्षी सिन्हाने नुकतेच 23 जूनला जहीर इक्बालसोबत लग्न केले. या दोघांनी शाही लग्नसोहळ्याएवजी रजिस्टर्ड पद्धतीने लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. लग्नानंतर घरातील मंडळींसह खास मित्रांना ग्रँड रिसेप्शन कपलने दिला. रिसेप्शनवेळी कपलसह पाहुण्यांनी पार्टीची मजा लुटल्याचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अशातच सोनाक्षीचे दोन्ही भाऊ लव आणि कुश कोणत्याही फोटो अथवा व्हिडीओमध्ये न दिल्याने चर्चा सुरु झाली. यावर आधी लव सिन्हाने प्रतिक्रिया दिली. आता कुश सिन्हाने प्रतिक्रिया देत बोलणाऱ्यांची तोंड बंद केली आहेत.

काय म्हणाला कुश सिन्हा
सोनाक्षीच्या लग्नसोहळ्यावेळी तिचे आई-वडील दिसले. पण दोन्ही भावंडे न दिसल्याने अशी चर्चा सुरु झाली की, त्या दोघांनी लग्नाला उपस्थिती लावलीच नाही. यावरच सोनाक्षीचा भाऊ कुश सिन्हाने प्रतिक्रिया दिली आहे. न्यूज 18 ला दिलेल्या मुलाखतीत कुशने म्हटले की, जहीर इक्बालसोबत बहिणीचे लग्न होणार असल्याच्या वादाच्या केवळ अफवा होत्या. खरंतर, परिवारासाठी हा संवेदनशील वेळ आहे. मी आधीसुद्धा काहींना चुकीची माहिती शेअर करताना पाहिले आहे. मला माहिती नाही नक्की कोण करतेय आणि हे सर्व कुठून येतेय.

मी लग्नात होतो- कुश सिन्हा
कुश सिन्हाने खुलासा केला की, सोनाक्षी आणि जहीरच्या लग्नावेळी मी होतो. खरंतर मी एक खासगी व्यक्ती असल्याने मला लाइमलाइटमध्ये पाहिले जात नाही. याचा अर्थ असा होत नाही की, लग्नात मी नव्हतो. बहिणीच्या लग्नावेळी तिला शुभेच्छा आणि आनंदासाठी नेहमीच प्रार्थना करेन.

7 वर्ष डेट केल्यानंतर सोनाक्षीने केले लग्न
सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बालने एकमेकांना सात वर्षे डेट केल्यानंतर 23 जूनला लग्नगाठ बांधली. यावेळी मित्रपरिवाराने दोघांच्या लग्नाला उपस्थिती लावत शुभाशिर्वाद दिले. यानंतर झालेल्या रिसेप्शन पार्टीत सलमान खान, हनी सिंह, काजोल, हुमा कुरैशी, अनिल कपूरसह काही कलाकारांनी उपस्थिती लावली होती.

आणखी वाचा : 

माझ्या लेकीने...सोनाक्षीच्या लग्नाच्या वादावर भडकले शत्रुघ्न सिन्हा

सोनाक्षी-जहीरच्या लग्नात दिसले नाही भाऊ, लव सिन्हाने आता प्रतिक्रिया देत म्हटले...