सोनाक्षी-जहीरच्या लग्नात दिसले नाही भाऊ, लव सिन्हाने आता प्रतिक्रिया देत म्हटले...

| Published : Jun 25 2024, 08:52 AM IST

Luv Siha Reaction on Sonakshi Wedding

सार

Sonakshi-Zaheer Wedding : सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बालचे अखेर 23 जूनला रजिस्टर्ड मॅरेज झाले आहेत. कपलने लग्नानंतर रिसेप्शन पार्टीचे मित्रपरिवारासाठी आयोजन केले होते. यावेळी सोनाक्षीचे दोन्ही भाऊ दिसले नाही. 

Sonakshi Sinha- Zaheer Iqbal Wedding : सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बालचे अखेर 23 जूनला रजिस्टर्ड मॅरेज झाले आहेत. कपलने लग्नानंतर रिसेप्शन पार्टीचे मित्रपरिवारासाठी आयोजन केले होते. यावेळी सोनाक्षीचा भाऊ लव सिन्हा दिसला नाही. यावर लव सिन्हाने प्रतिक्रिया दिली आहे.

बॉलिवूडमधील दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल यांनी 23 जूनला एकमेकांसोबत लग्नगाठ बांधली. यावेळी दोन्ही परिवारातील सदस्य उपस्थितीत होते. लग्नसोहळ्यादरम्यान, पापराझींना सोनाक्षीचा भाऊ लव सिन्हा दिसला नाही. अशातच चर्चा लव सिन्हाने सोनाक्षीच्या लग्नाला उपस्थिती न लावल्याच्या जोरदार चर्चा सुरु झाल्या.

हिंदुस्तान टाइम्ससोबत संवाद साधताना लव सिन्हाने म्हटले की, मला एक-दोन दिवस द्या. मला जेव्हा वाटेल तेव्हा तुमच्या प्रश्नांची उत्तरे देईन. विचारण्यासाठी आभार. यानंतर रिपोर्टमध्ये सोनाक्षीचा भाऊ न दिसण्यामागील कारण सांगण्यात आले. याशिवाय लग्नसोहळ्यावेळीही लव नव्हता असेही म्हटले. यावरच खुद्द लव सिन्हाने प्रतिक्रिया दिली आहे. 

सूत्रांनी काय म्हटले? 
छापण्यात आलेल्या रिपोर्ट्समद्ये सूत्रांनी म्हटले की, सोनाक्षीच्या आई-वडिलांनी लग्नाला उपस्थिती लावली आणि ते या लग्नासाठी आनंदित होते. पण भाऊ ना लग्नात ना रिसेप्शनवेळी दिसला. फोटोग्राफर्सने दोन्ही वेन्यूच्या प्रत्येक पाहुण्याच्या एण्ट्रीवर लक्ष ठेवले होते. यावेळीही भाऊ न दिसल्याने अधिक चर्चा सुरु झाली. याच रिपोर्टवर प्रतिक्रिया देत एक स्क्रिनशॉर्ट शेअर करत लव सिन्हाने म्हटले की,"एका सूत्राने उत्तम सूत्रे शोधण्याची गरज आहे."

कोर्ट मॅरेजनंतर पापाराझींनी केले स्पॉट
सोनाक्षी सिन्हाने वांद्रे येथील अपार्टमेंटमध्ये कोर्ट मॅरेज केल्यानंतर तेथून निघताना लव सिन्हाला पापाराझींनी स्पॉट केले. याचे फोटोही सोशल मीडियात व्हायरल झाले. दरम्यान, रिसेप्शनसाठी सोनाक्षीचे दोन्ही भाऊ पापाराझींना दिसले नाही.

दरम्यान ईटाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीत लव सिन्हाने म्हटले होते, "मी मुंबई बाहेर आहे. या बातम्यांवर मला कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नाही. शिवाय माझे याच्याशी काही घेणेदेणेही नाही."

आणखी वाचा : 

Sonakshi Sinha-Zaheer Iqbal च्या लग्नावरुन वाद, शत्रुघ्न सिन्हांना घरासह परिवाराचे नाव बदलण्याचा इशारा

सोनाक्षी-जहीरच्या रिसेप्शन पार्टीत रेखाची अदा, वळल्या सर्वांच्या नजरा