माझ्या लेकीने...सोनाक्षीच्या लग्नाच्या वादावर भडकले शत्रुघ्न सिन्हा
Entertainment Jun 25 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:Our own
Marathi
जहीरसोबत लग्न केल्याने सोनाक्षी ट्रोल
सोनाक्षी सिन्हाने 23 जूनला जहीर इक्बालसोबत लग्नगाठ बांधली. यामुळेच अभिनेत्रीला ट्रोल करण्यासह वेगवेगळ्या कमेंट्सही केल्या जातायत.
Image credits: Google
Marathi
शत्रुघ्न सिन्हांवरही निशाणा
शत्रुघ्न सिन्हांना निशाण्यावर धरत त्यांच्या विरोधात बिहारमध्ये विरोध केला जात आहे. याशिवाय शत्रुघ्न यांना रामायण आणि मुलांची नाव बदलण्याचाही सल्ला दिला जातोय.
Image credits: instagram
Marathi
शत्रुघ्न सिन्हांनी लेकीच्या लग्नाबद्दल सोडले मौन
शत्रुघ्न सिन्हांनी सोनाक्षी सिन्हाच्या वादावर मौन सोडत म्हटले की, माझ्या लेकीने काहीही चुकीचे केलेले नाही. यामुळे तिच्यावर कोणीही काहीही कमेंट्स करण्याचा अधिकार नाही.
Image credits: instagram
Marathi
लोक बोलतच राहणार- शत्रुघ्न सिन्हा
टाइम्स नाउसोबत संवाद साधताना शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, लोक बोलतच राहणार आणि लोकांचे कामच आहे बोलणे.
Image credits: Social media
Marathi
लेकीने काही बेकायदेशीर केलेले नाही
शत्रुघ्न सिन्हांनी पुढे म्हटले की, “बोलणारी लोक व्यर्थ, बिनकामी असतील तर हेच त्यांचे काम आहे. माझ्या लेकीने काहीही बेकायदेशीर आणि असंविधानिक गोष्ट केलेली नाही.”
Image credits: Social media
Marathi
कोणालाही लेकीवर कमेंट्स करण्याचा अधिकार नाही
लग्न दोन जणांचा व्यक्तिगत निर्णय असतो. यामध्ये कोणालाही दखल अथवा कमेंट्स करण्याचा अधिकार नसल्याचेही शत्रुघ्न सिन्हांनी म्हटले आहे.
Image credits: Social Media
Marathi
ट्रोलर्सला शत्रुघ्न सिन्हांनी भरला दम
शत्रुघ्न सिन्हांनी ट्रोलर्सला दम देत म्हटले की, तुम्ही सर्वांनी आपले आयुष्य जगा. आयुष्यात काहीतरी करा. बाकी मला काहीही बोलायचे नाही.