सार

अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडेचा गर्भाशयाच्या कॅन्सरने (Cervical Cancer) मृत्यू झाल्याची पोस्ट नुकतीच तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर करण्यात आली होती. अशातच KRKकडून पूनम पांडेचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

KRK Shares Recent Video of Poonam Pandey : मॉडेल पूनम पांडेच्या मृत्यूच्या बातम्यांमुळे सर्वजण हैराण झाले आहेत. अभिनेत्रीच्या चाहत्यांना आणि नेटकऱ्यांना तिचे निधन झालेय हे पचत नाहीय. यावरुन सर्वजण वेगवेगळे तर्कवितर्क लावत आहेत. अशातच कमाल आर खान उर्फ केआरके (KRK) ने पूनम पांडेचा एक व्हिडीओ त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओवर अभिनेत्री रोजलिन खानने (Rozlyn Khan) प्रतिक्रिया दिली आहे.

केआरकेकडून पूनमचा व्हिडीओ व्हायरल
पूनम पांडेच्या मृत्यूच्या बातम्यांदरम्यान केअरकेने तिचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. खरंतर पूनम पांडेचा शेअर करण्यात आलेला व्हिडीओ दोन दिवस आधीचा असल्याचे सांगण्यात आले आहे. याशिवाय अभिनेत्री एका पार्टीत मजा करत असल्याचे दिसून येत आहे.

केआरकेने व्हिडीओ शेअर करण्यासह म्हटले की, अभिनेत्री पूनम पांडे दोन दिवस आधी एका पार्टीत मजा-मस्ती करत होती. याशिवाय व्हिडीओमध्ये पूनम सोबत काहीजण पार्टी करताना दिसून येत आहेत.

View post on Instagram
 

अभिनेत्री रोजलिन खानने म्हटले ‘फेक न्यूज’
अभिनेत्री रोजलिन खानने केआरकेच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया देत म्हटले की, खरंतर ही एक फेक न्यूज आहे. गर्भाशयाच्या कॅन्सर चौथ्या स्टेजचा, कोणीही यावर हसेल. मी माझ्या डॉक्टरांशी या संदर्भात बोलली आहे. मला पूनमच्या मृत्यूच्या बातम्यांवर विश्वास बसत नाहीय."

दरम्यान, रोजलिनला कॅन्सर झाला होता. तिला ऑलिगोमेटास्टॅटिक कॅन्सर (Oligometastatic Cancer) झाला होता. रोजलिनवर या कॅन्सरसंदर्भात आजही उपचार सुरू आहेत.

रोजलिनने खानने पूनम पांडेवर केला हल्लाबोल
पूनम पांडेच्या मृत्यूच्या बातम्यांवरुन रोजलिन खानने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये रोजलिनने म्हटले की, “मला माहिती नाही पूनमच्या बातम्या कितपत खऱ्या आहेत की नाही. पण काहीजण प्रसिद्धीसाठी कॅन्सर आजाराचे नाव पुढे करतात. 20 दशलक्षाहून अधिक रुग्ण आहेत जे गर्भाशयाच्या कॅन्सरने पीडित आहेत. एका कॅन्सर रुग्णाच्या मृत्यूमुळे दुसऱ्या कॅन्सर रुग्णामध्ये आयुष्य जगण्याची इच्छाशक्ती कमी होते. येत्या 4 फेब्रुवारीला जागतिक कर्करोग दिवस (World Cancer Day) साजरा केला जाणार आहे.”

View post on Instagram
 

Rozlyn Khan Instagram Story :

आणखी वाचा :

Poonam Pandey : अवघ्या 12 दिवसात मोडला होता पूनम पांडेचा विवाह

अभिनेत्री पूनम पांडेचे Cervical Cancer ने निधन, वेळीच ओळखा या कर्करोगाचा धोका

साउथ सुपरस्टार थलापति विजयची राजकरणात एण्ट्री, स्वत: च्या राजकीय पक्षाची केली घोषणा