अभिनेत्री पूनम पांडेचे Cervical Cancer ने निधन, वेळीच ओळखा या कर्करोगाचा धोका
- FB
- TW
- Linkdin
पूनम पांडेचे अकस्मात निधन
अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडेचे Cervical Cancer म्हणजेच गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाने अकस्मात निधन झाले आहे. 2 फेब्रुवारीला सकाळी तिच्या सोशल मीडिया हँडलवर तिच्या अकस्मात निधनाची धक्कादायक पोस्ट शेअर करण्यात आली, जी पाहून चाहते अस्वस्थ झाले आहेत.
गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग म्हणजे काय?
गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा एक प्रकारचा कर्करोग आहे जो गर्भाशयाच्या मुखाच्या पेशींमध्ये, गर्भाशयाच्या खालच्या भागात विकसित होतो. हा कर्करोग प्राणघातक असल्याने त्याचे वेळीच निदान होणे अत्यंत आवश्यक आहे. जगभरात दरवर्षी पाच लाखांपेक्षा जास्त महिलांमध्ये या कर्करोगाचे निदान होते. महिलांमधील कर्करोगाशी संबंधित मृत्यूचे हे एक प्रमुख कारण आहे.
गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे (Cervical Cancer) प्रकार
गर्भाशयाच्या कर्करोगाचे प्रामुख्याने दोन प्रकारांमध्ये वर्गीकरण केले जाते: स्क्वॅमस सेल कार्सिनोमा आणि एडेनोकार्सिनोमा. या कर्करोगावर प्रभावी उपचार करण्यासाठी त्याचे व्यवस्थित निदान होणे आवश्यक आहे.
गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची लक्षणे
प्रारंभिक अवस्थेत असताना गर्भाशयाच्या ग्रीवेचा कर्करोग विशेष वेगळी लक्षणे दर्शवत नाही. म्हणूनच हा कर्करोग प्राणघातक ठरतो. कर्करोग पसरल्यास योनीतून अतिरिक्त रक्तस्त्राव, ओटीपोटात वेदना आणि संभोगाच्या दरम्यान वेदना ही लक्षणे प्रामुख्याने आढळतात.
गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची संभावित कारणे
कर्करोगाचे मूळ कारण शोधण्यास अजूनही आपल्याला शंभर टक्के यश आलेले नाही. परंतु काही घटक गर्भाशयाच्या ग्रीवेच्या कर्करोगाच्या विकासास हातभार लावतात, ज्यामध्ये धूम्रपान आणि लैंगिक संबंधांतून पसरणारे आजार यांचा समावेश होतो.
प्रतिबंधात्मक उपाय
या कर्करोगाचा प्रतिबंध करण्यासाठी सुरक्षित लैंगिक संबंध, नियमित तपासणी आणि एचपीव्ही लसीकरण यासारख्या प्रतिबंधात्मक उपायांची माहिती असणे व त्यांचा अवलंब करणे महत्वाचे आहे. हे उपाय केल्यास गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचा धोका लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतो.
HPV लसीबद्दल जाणून घ्या
तुमच्या डॉक्टरांना HPV लसीबद्दल विचारा. एचपीव्ही संसर्ग टाळण्यासाठी लसीकरण केल्याने तुमचा गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग आणि इतर एचपीव्ही-संबंधित कर्करोगाचा धोका कमी होऊ शकतो. एचपीव्ही लस तुमच्यासाठी योग्य आहे का व ती केव्हा घ्यावी याबद्दल तुमच्या स्त्रीरोगतज्ज्ञांशी चर्चा करा.
नियमित पॅप टेस्ट करा.
पॅप चाचणीमध्ये गर्भाशयाच्या कर्करोगाच्या पूर्वस्थितीचे निदान होऊ शकते. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग टाळण्यासाठी या परिस्थितींचे परीक्षण व त्यावर उपचार केले जाऊ शकतात. तज्ज्ञांच्या मते महिलांनी एकविसाव्या वर्षापासून नियमित पॅप चाचणी करणे आवश्यक आहे.
धूम्रपान करू नका.
धूम्रपान अनेक आजारांना निमंत्रण देते. धूम्रपानामुळे अनेक प्रकारचे कर्करोग तसेच हृदयासंबंधी आजारांचा देखील धोका वाढतो. त्यामुळे धूम्रपान सोडा.
वेळीच निदान होणे आवश्यक
कुठल्याही प्रकारचा कर्करोग हा लवकर लक्षात आला तर ते रुग्णांसाठी फायद्याचे असते. गर्भाशयाच्या ग्रीवेचा कर्करोग देखील प्रारंभिक अवस्थेत असताना लक्षात येऊ शकतो. त्यासाठी नियमित पॅप स्मीअर आणि एचपीव्ही चाचणी करणे आवश्यक आहे. तसेच कुठल्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करणे धोक्याचे आहे.
सर्व्हायकल कॅन्सरचे निदान झाल्यास शस्त्रक्रिया, रेडिएशन थेरपी आणि केमोथेरपी ही उपचारपद्धती केली जाते.परंतु उपचार करताना कर्करोगाची अवस्था आणि रुग्णाचे एकूण आरोग्य हे घटक गृहीत धरले जातात. प्रारंभिक अवस्थेत असताना कर्करोग पूर्णपणे बरा होण्याची शक्यता लक्षणीय असते.
आणखी वाचा -
Lock Upp स्टार पूनम पांडेचे निधन, इंस्टाग्रामवरील पोस्टमधून खुलासा
शोएब मलिकची पत्नी सना जावेदच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप, दिल्या अशा प्रतिक्रिया