सार

साउथ सिनेमातील अभिनेता यश याचा वाढदिवस नुकताच साजरा झाला. यावेळी अभिनेत्याचा वाढदिवस साजरा करणाऱ्या तीन चाहत्यांना विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली.

Yash's Birthday : साउथ अभिनेता आणि केजीएफ (KGF) सिनेमातील स्टार यश (Yash) याचा 8 जानेवारीला वाढदिवस होता. यामुळे अभिनेत्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तीन चाहत्यांकडून बॅनर लावले जात होते. पण अचानक तिघांना विजेचा धक्का लागला आणि त्यांचा मृत्यू झाला. 

अभिनेता यश याला चाहत्यांच्या मृत्यूबद्दल कळले असता तो चाहत्यांच्या परिवाला भेट देण्यासाठी हुबळीत आला. कर्नाटकातील गदक जिल्ह्यातील सुरंगी गावात ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे.

अभिनेत्याच्या वाढदिवसादिवशीच तीन चाहत्यांचा मृत्यू
साउथ अभिनेता यशचा वाढदिवस साजरा करणारे तीन चाहते लक्ष्मेश्वर तालुक्यातील सुरंगी गावातील होते. गावात यशच्या वाढदिवसानिमित्त बॅनर लावले जात होते. यावेळीच तिघांना अचानक विजेचा धक्का लागला आणि त्यांचा मृत्यू झाला.

हनमंत हरिजन (21 वर्षे), मुरली नादविनामनी (20 वर्षे) आणि नवीन गाजी (19 वर्षे) अशी मृतांची नावे आहेत. याशिवाय अन्य तीनजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर लक्ष्मेश्वर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना लक्ष्मेश्वर पोलीस स्थानकाच्या परिसरात घडवल्याचे सांगितले जात आहे.

अभिनेता यशच्या कामाबद्दल थोडक्यात…
साउथ अभिनेता यशच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, यंदाच्या वर्षात त्याचा कोणताही सिनेमा प्रदर्शित होणार नाहीय. पण नुकत्याच आपला आगामी सिनेमा 'टॉक्सिक'ची (Toxic) एक क्लिप अभिनेत्याने शेअर केली होती. टॉक्सिक सिनेमा पुढील वर्षात 10 एप्रिल 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे.

याशिवाय यशचा आगामी सिनेमा 'केजीएफ-3' ची देखील चाहत्यांकडून प्रतीक्षा केली जात आहे. या सिनेमाचे शूटिंग लवकरच सुरू होणार असल्याचे बोलले जात आहे.

अभिनेत्याचा सिनेसृष्टीतील प्रवास
साउथ अभिनेत्याने वर्ष 2007 मध्ये आपल्या सिनेसृष्टीतील करियरला सुरुवात केली होती. पण वर्ष 2018 मध्ये अभिनेत्याला ‘केजीएफ-1’ च्या सिनेमातून प्रसिद्धी मिळाली. यानंतर वर्ष 2022 मध्ये प्रदर्शित झालेलेल्या ‘केजीएफ-2’ सिनेमातून जगभरात प्रसिद्धी मिळाली आणि त्याला ‘रॉकिंग स्टार’ म्हणून संबोधले जाऊ लागले. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 1250 कोटी रूपयांची कमाई केली होती.

आणखी वाचा : 

आयरा खानच्या लग्नसोहळ्याचे खास Invitation Card पाहिले का?

हॉलिवूड कलाकार क्रिश्चियन ओलिव्हरचा विमान अपघातात मृत्यू, अभिनेत्याच्या दोन मुलींनीही गमावला जीव

2024 मध्ये प्रदर्शित होणार देशातील हे 11 बिग बजेट सिनेमे