सार

Kangana Ranaut Emergency Movie : कंगना राणौतचा बहुप्रतिक्षित सिनेमा 'इमरजेंसी' ची नवी तारीख जाहीर करण्यात आली आहे. अभिनेत्रीने इंस्टाग्रावर सिनेमाचे नवे पोस्टर देखील शेअर केले आहे.

Kangana Ranaut Announces New Date Of Emergency : अभिनेत्री कंगना राणौतचा आगामी सिनेमा इमरजेंसीची प्रेक्षकांची मोठ्या उत्सुकतेने वाट पाहिली जात आहे. वारंवार सिनेमाचा प्रदर्शित होण्याची तारीख बदलण्यात आली आहे. अशातच सिनेमाची कंन्फर्म तारीख समोर आली आहे. लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर आता अखेर कंगनाने सिनेमाची नवी तारीख सोशल मीडियावर जाहीर केली आहे. यासंदर्भातील एक पोस्टरही सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर शेअर केले आहे.

कंगना राणौतची इंस्टाग्रामवरील पोस्ट
कंगना राणौतने इंस्टाग्रावर इमरजेंसी सिनेमाचे नवे पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरवर सिनेमा 6 सप्टेंबर, 2024 असे लिहिले आहे. या पोस्टखाली कंगनाने लिहिलेय की, स्वतंत्र भारताच्या सर्वाधिक काळ्या अध्याच्या 50व्या वर्षाची सुरुवात, 6 सप्टेंबर, 2024 रोजी सिनेमागृहांमध्ये पाहता येणार आहे. याशिवाय #KanganaRanaut #Emergency असे हॅशटॅगही वापरण्यात आले आहेत. सिनेमामध्ये कंगना राणौत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन कंगनानेच केले आहे. आता सिनेमाची नवी तारीख जाहीर झाल्यानंतर प्रेक्षक सिनेमा पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

View post on Instagram
 

युजर्सने दिल्या अशा प्रतिक्रिया
एका युजरने म्हटले की, भारतीय संविधानातील सर्वाधिक काळा अध्याय पाहण्याची वाट पाहू शकत नाही. दुसऱ्याने म्हटले, सिनेमा टॅक्स फ्री असावा. तिसऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटले की, सिनेमा ब्लॉकबस्टर असावा. अशाप्रकारच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया युजर्सने दिल्या आहेत.

सिनेमातील स्टारकास्ट
कंगना राणौतच्या इमरजेंसी सिनेमातील स्टारकास्टबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये श्रेयस तळपदे, महीमा चौधरी, मिलिंद सोमण, विशाख नायर, सतीश कौशिक, लॅरी न्यू यॉर्कर, क्रिस्टोफ गाइटबेट, मनवीर चौधरी, जेबा हुसैन, राजू कुमार झळकणार आहेत.

सिनेमा जून महिन्यात प्रदर्शित होणार होता. दरम्यान, कंगना राणौतचा गेल्या काही काळापासून एकही सिनेमा हिट ठरला नाही. अखेरचे 6 सिनेमे बॉक्स ऑफिसवर आपटले होते. वर्ष 2023 मध्ये आलेल्या 'तेजस' सिनेमातून कंगनला खूप अपेक्षा होता. पण सिनेमा सुपरफ्लॉप ठरला.

आणखी वाचा : 

BBOTT3 मधील या 3 स्पर्धकांची सर्वाधिक फी, नाव ऐकून बसेल धक्का

TV मालिका ते रुपेरी पड्यावर पोहोचलेल्या सई ताम्हणकरच्या खास गोष्टी