TV मालिका ते रुपेरी पड्यावर पोहोचलेल्या सई ताम्हणकरच्या खास गोष्टी
Entertainment Jun 25 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:Instagram
Marathi
सई ताम्हणकरचा वाढदिवस
सई ताम्हणकर आज (25 जून) तिचा वाढदिवस साजरा करत आहे. अशातच अभिनेत्रीच्या मराठी ते हिंदी सिनेसृष्टीतील करियरबद्दलच्या काही खास गोष्टी जाणून घेऊयात...
Image credits: Instagram
Marathi
सईचा जन्म आणि शिक्षण
सई ताम्हणकरचा जन्म सांगलीतील आहे. अभिनेत्रीने स्वातंत्र्य वीर सावकर प्रतिष्ठान, प्रबोधिनी प्रशाला विश्रामबाग येथे शिक्षण पूर्ण केले आहे.
Image credits: Instagram
Marathi
नाटकातून अभिनयाची आवड
सईला नाटकातून अभिनयाची आवड निर्माण झाली. आंतर-महाविद्यालयीन नाट्यस्पर्धेत ‘आधे-अधूरे’ नाटकासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला होता.
Image credits: Instagram
Marathi
पहिली टेलिव्हिजन मालिका
सई ताम्हणकरने ‘तुझ्याविना’ सिनेमात साइड रोलसह टेलिव्हिजनच्या जगात पाऊल ठेवले. ईटीव्ही मराठीवरील ‘गोजिरवाण्या घरात’ या मालिकेतून सई घरोघरी पोहोचली गेली.
Image credits: Instagram
Marathi
हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण
वर्ष 2008 मध्ये सईने सुभाष घईंच्या ‘ब्लॅक अँड व्हाइट' सिनेमात काम करत हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले. याशिवाय ‘गजनी’ सिनेमातही सई ताम्हणकर झळकली आहे.
Image credits: Instagram
Marathi
'हंटर' सिनेमातील भूमिकेमुळे चर्चा
‘हंटर’ सिनेमातील जोत्सना नावाच्या भूमिकेमुळे सईची सर्वाधिक चर्चा झाली. बोल्ड असे पात्र साकारणाऱ्या सईसोबत सिनेमात राधिका आपटे आणि गुलशन देवय्याही मुख्य भूमिकेत झळकले होते.
Image credits: Instagram
Marathi
सई ताम्हणकरचे सिनेमे
हंटर सिनेमाव्यतिरिक्त सई लव्ह सोनिया, मिमी, भक्षक, इंडिया लॉकडाउनमध्ये झळकली आहे. याशिवाय सईचे मराठीतील क्लासमेट्स, प्यार वाली लव्ह स्टोरी, पुणे-52 असे काही सिनेमे गाजले आहेत.
Image credits: Instagram
Marathi
सईचा आगामी सिनेमा
सई ताम्हणकर 'अग्नि' सिनेमातून झळकणार आहे. यामध्ये प्रतीक गांधी, दिव्येंदू शर्मा, जितेंद्र जोशी आणि सैयामी खेर कलाकार दिसणार आहेत.