गरोदर दीपिका पादुकोणला हात पुढे करणाऱ्या प्रभाससोबत अमिताभ यांनी केले असे काही की...., व्हायरल होतोय व्हिडीओ (Watch)

| Published : Jun 20 2024, 03:19 PM IST / Updated: Jun 20 2024, 03:21 PM IST

Kalki 2898 Ad Movie
गरोदर दीपिका पादुकोणला हात पुढे करणाऱ्या प्रभाससोबत अमिताभ यांनी केले असे काही की...., व्हायरल होतोय व्हिडीओ (Watch)
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

Amitabh Bachchan Viral Video : दीपिका पादुकोण, प्रभास आणि अमिताभ बच्चन अशी तगडी स्टारकास्ट असणाऱ्या कल्कि 2898 एडीच्या प्रेस कॉन्फ्रेंसचे आयोजन नुकतेच मुंबईत झाले. यादरम्यानचा एक मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Amitabh Bachchan Viral Video : साउथ सुपरस्टार प्रभासचा आगामी सिनेमा कल्कि 2898 एडी सिनेमा प्रदर्शित होण्याची प्रेक्षकांकडून वाट पाहिली जात आहे. अशातच मुंबईत नुकताच सिनेमासंदर्भात प्रेस कॉन्फ्रेन्सचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सिनेमातील स्टारकास्टसह निर्मात्यांनी उपस्थिती लावली होती. याच इवेंटसंदर्भातील काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये प्रभासने गरोदर दीपिका पादुकोणला हात दिला असता मागून आलेल्या अमिताभ बच्चन यांच्या हरकतीमुळे सर्वांना आता आपले हसू आवरत नाहीये.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये नक्की काय?
कल्कि 2898 एडीच्या प्रेस कॉन्फ्रेंसमधून आपले म्हणणे मांडल्यानंतर दीपिका पादुकोण स्टेजवरुन उतरणार होती. एवढ्यात प्रभास आणि अमिताभ बच्चन दीपिकाला हात देण्यासाठी पुढे आले. अशातच प्रभासने दीपिकाला हात दिला आणि मंचावरुन खाली उतरण्यास मदत केली. यानंतर अमिताभ बच्चन यांनी प्रभासचा क्लास घेतल्यानंतर सर्वत्र हस्याचा माहोल तयार झाला. याचाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून युजर्सकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.

View post on Instagram
 

स्टारकास्टने शेअर केला अनुभव
कल्कि 2898 एडी सिनेमातील प्रत्येक स्टारने आपल्या भूमिकेबद्दलचा अनुभव शेअर केला. दीपिकाने म्हटले की, दिग्दर्शक नाग अश्विनसोबत काम करताना उत्तम अनुभव आला. अमिताभ बच्चन यांनीही सिनेमासंदर्भातील अनुभव शेअर करत म्हटले की, हे एक नवे जग आहे. नागा यांच्या कल्पनेतून साकारलेला सिनेमा लवकरच प्रदर्शित होईल.

सिनेमाचे बजेट
दिग्दर्शक नागा अश्विन यांनी सिनेमा कल्की 2898 एडी 600 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार केला आहे. सिनेमात अमिताभ बच्चन, दीपिका पादुकोण, दिशा पाटनीसह अन्य कलाकारही मुख्य भूमिकेत आहेत. येत्या 27 जूनला जगभरातील सिनेमागृहांमध्ये कल्की 2898 एडी सिनेमा प्रदर्शित होणार आहे. सिनेमा तमिळ, तेलुगु, कन्नड, मल्याळमसह हिंदी भाषेतही प्रदर्शित केला जाणार आहे.

आणखी वाचा : 

'Yoga Se Hi Hoga', बॉलिवूडमधील 10 अभिनेत्रींच्या तारुण्याचा मंत्रा

वडिलांच्या घरी सोनाक्षीच्या लग्नाच्या विधी होणार नाहीत? वाचा कारण