धुव्वादार कमाई करणाऱ्या Kalki 2898 AD सिनेमाच्या OTT रिलीज डेटमध्ये बदल, प्रेक्षकांना करावी लागणार आणखी प्रतिक्षा

| Published : Jul 03 2024, 09:26 AM IST / Updated: Jul 03 2024, 09:27 AM IST

Kalki 2898 AD Movie OTT Release Date

सार

Kalki 2898 AD OTT Release : दीपिका आणि प्रभासचा सिनेमा कल्कि 2898 एडी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. अशातच सिनेमा ओटीटीवर रिलिज होण्यासाठी प्रेक्षकांना अधिक वाट पहावी लागणार आहे.

Kalki 2898 AD OTT Release :  प्रभास, अमिताभ बच्चन आणि दीपिका पादुकोण यांचा सिनेमा कल्कि 2898 एडी सिनेमा बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करताना दिसून येत आहे. कल्कि 2898 एडी अवघ्या सहा दिवसांतच यंदाच्या वर्षातील ब्लॉकबस्टर सिनेमा ठरला आहे. अशातच सिनेमा ओटीटीवर रिलीज करण्यासंदर्भात एक अपडेट समोर आले आहे. यानुसार प्रेक्षकांना ओटीटवर कल्कि 2898 एडी सिनेमा पाहण्यासाठी आणखी प्रतिक्षा करावी लागणार आहे. याआधी सिनेमा जुलै महिन्याच्या अखेरीस ओटीटीवर रिलीज होईल असे सांगण्यात आले होते.

कल्कि 2898 एडी सिनेमाची बॉक्स ऑफिसवर धूम
नाग अश्विन यांनी दिग्दर्शित केलेल्या कल्कि 2898 एडी सिनेमा बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करताना दिसून येत आहे. पण ओटीटीवर पाहण्यासाठी प्रेक्षकांना थोडी वाट पहावी लागणार आहे. अ‍ॅमेझॉन प्राइमने सर्व दाक्षिणात्य भाषांचे अधिकार घेतले आहेत. तर नेटफ्लिक्सने हिंदी वर्जनचे अधिकार घेतलेत. सिनेमाच्या निर्मात्यांकडून डिजिटल रिलीजची डेट पुढे ढकलण्यासंदर्भात ओटीटी प्लॅटफॉर्मसोबत बातचीत केली जात आहे.

कल्कि 2898 एडी सिनेमाची ओटीटी रिलीज डेट
रिपोर्ट्सनुसार, सिनेमा जुलै महिन्याच्या अखेरीस डिजिटल प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होण्याची अपेक्षा होती. पण ताज्या माहितीनुसार, कल्कि 2898 एडी सिनेमा आता सप्टेंबर, 2024 च्या दुसऱ्या आठवड्यात रिलीज केला जाऊ शकतो. खरंतर, कल्कि 2898 एडी सिनेमा नाग अश्विन यांनी दिग्दर्शित केला असून तो सध्या यंदाच्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा ठरत आहे.

सिनेमामध्ये प्रभास, अमिताभ बच्चन, दीपिका पादुकोण आणि कलम हसन मुख्य भुमिकेत आहेत. सिनेमाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर 625 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे.

कल्कि 2898 एडी सिनेमाचा दुसरा भाग
कल्कि 2898 एडी सिनेमाचा दुसरा भाग कधी येणार याची उत्सुकता आतापासूनच प्रेक्षकांना लागली आहे. याच्या रिलीज डेटबद्दल प्रोड्यूसर अश्विनी दत्त यांनी म्हटले की, सिनेमाचे काम 60 टक्के पूर्ण झाले आहे. केवळ मोठ्या हिस्याचे शूटिंग अद्याप शिल्लक आहे. याशिवाय सिनेमाची रिलीज डेटही ठरवण्यात आलेली नाही.

आणखी वाचा : 

घरोघरी भांडी घासून आईने वाढवले, आता Bharti Singh एवढ्या CR ची मालकीण

प्रभासच्या Kalki 2898 AD सिनेमाने USA मध्ये मोडला शाहरुखचा रेकॉर्ड, पठाण आणि जवानपेक्षा केली वरचढ कमाई