Kalki 2898 AD सिनेमा हिट होणार की फ्लॉप? वाचा 600 कोटींच्या फिल्मचा Review

| Published : Jun 10 2024, 04:33 PM IST / Updated: Jun 10 2024, 04:34 PM IST

Prabhas Kalki 2898AD Team Filed Legal Case

सार

प्रभास-दीपिका पादुकोणचा आगामी सिनेमा कल्कि 2898 एडीचा ट्रेलर आज संध्याकाळी 7 वाजता प्रदर्शित होणार आहे. तत्पूर्वी सिनेमाचा सर्वप्रथम रिव्हू येथे तुम्हाला वाचायला मिळणार आहे.

Kalki 2898 AD Movie Social Media Review : सुपरस्टार प्रभासचा आगामी सिनेमा कल्कि 2998एडीच्या ट्रेलरची सर्वजण आवर्जुन वाट पाहत आहेत. रिपोर्ट्सनुसार, आज संध्याकाळी 7 वाजता सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित केला जाणार आहे. निमार्त्यांनी सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत त्यामध्ये ट्रेलर किती वाजता लाँच होणार याची माहिती दिली आहे.

दिग्दर्शक नाग अश्विन यांचा कल्कि 2898एडी सिनेमा येत्या 27 जूनला जगभरातील सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. तत्पूर्वी सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म X वर सिनेमाचे रिव्हू शेअर केले जात आहेत. जाणून घेऊया सिनेमा हिट होणार की फ्लॉप याबद्दलचा सर्वप्रथच रिव्हू सविस्तर…

सिनेमा हिट होणार की फ्लॉप?
प्रभासच्या Kalki 2898 AD सिनेमाबद्दल सोशल मीडियावर रिव्हू शेअर केले जात आहेत. काही युजर्सने कमेंट्स करत आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. गेल्या 24 तासांमध्ये #Kalki2898AD चा वापर करुन अपडेट देणाऱ्या सूत्रांनी सांगितले की, सर्व रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आलेय की सिनेमा बॉक्स ऑफिसवर धूमाकूळ घालणारा ठरणार आहे.

एका युजरने लिहिले की, Kalki 2898 AD सिनेमा इंडियन सिनेमांचे सर्व रेकॉर्ड ब्रेक करेल. दुसऱ्या युजरने म्हटले की, एका धमाकेदार ब्लास्टसाठी सर्वजण तयार आहेत. तिसऱ्याने लिहिले की, सिनेमाच्या ट्रेलरची आवर्जुन वाट पाहतोय. एवढेच नव्हे बाहुबलीचा देखील रेकॉर्ड ब्रेक करु शकतो असेही काहींनी सिनेमाबद्दल बोलले आहे.

3.10 मिनिटांचा Kalki 2898 AD चा ट्रेलर
सिनेमा Kalki 2898 AD चा ट्रेलर 3 मिनिटे 10 सेकंदांचा असणार आहे. असे सांगितले जातेय की, निर्मात्यांनी ट्रेलर अत्यंत खास पद्धतीने तयार केला आहे. या सिनेमाचे बजेट 600 कोटी रुपये आहे. या सिनेमामध्ये तगडी स्टारकास्ट असणार आहे. प्रभास व्यतिरिक्त दीपिका पादुकोण, अमिताभ बच्चन, कमल हसन, दिशा पाटनी मुख्य भूमिकेत असणार आहे. याशिवाय सिनेमा तमिळ, तेलुगु, कन्नड, मल्याळम भाषांमध्येही प्रदर्शित केला जाणार आहे.

आणखी वाचा : 

'Mirzapur 3' च्या पोस्टरमध्ये दडलीय प्रदर्शित होण्याची तारीख, पाहा मिळतोय का Clue

सोनाक्षी सिन्हा प्रियकर जहीर इकबालसोबत करणार लग्न? वेडिंग डेट आणि वेन्यूची माहिती आली समोर